गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला काही ठिकाणी ‘बाप्पां’ चे धूमधडाक्यात आगमन
रुपेश वाईकर (दापोली प्रतिनिधी) जिल्हाभरात गणपती बाप्पाच्या आगमनाचा उत्साह शिगेला पोहोचला असून एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषणात बुधवार दिनांक 27 रोजी गणेश बाप्पांचे वाजत गाजत आगमन होणार आहे, तर काहींनी पावसाचे संकट पाहता व गणेश चतुर्थीच्या दिवशी होणारे धावपळ टाळण्यासाठी गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला बाप्पाला घरी आणणे पसंत केले आहे. गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणकर मोठ्या संख्येने गावी दाखल झाले आहेत. कोकण रेल्वेच्या गाड्यांना तुडुंब गर्दी आहे तसेच मुंबई-गोवा महामार्गावर ट्रॅफिक जामचा फटका बसला आहे.

कोकण आणि गणेशोत्सव यांचे एक अतुल नाते आहे. कोकणामध्ये घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन म्हणजे एक सोहळा असतो. घरच्या गणपतीसाठी कोकणकर मध्ये गावी आले आहेत. गेले दोन-तीन दिवस गणपती सजावटीच्या कामात भाविक व्यस्त आहेत. आता बुधवारी सकाळी वाजून जातात गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे. त्यानंतर गणपती बाप्पा विराजमान होऊन त्याची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. दररोज घरांमध्ये गणपती बाप्पांची पूजाअर्चा आणि आरत्यांमुळे मंगलमय वातावरण निर्माण होणार आहे.
रत्नागिरी तालुक्यामध्ये 27 हजार 700 गणेश मूर्तींची प्रतिस्थापना होणार आहे. दापोलीमध्ये 7845 मध्ये मूर्तीची प्रतिस्थापना होणार आहे. घरगुती गणेशोत्सवावर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी जय्यत तयारी केली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विविध कार्यक्रमांचे सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे.
कोकण रेल्वेने गणेश भक्तांसाठी 378 फेऱ्यांची घोषणा झाली आहे गेल्या दोन दिवसापासून या गणपती स्पेशल रेल्वे गाड्यातून मोठ्या संख्येने कोकणवासीय कोकणात दाखल होऊ लागल्याने रेल्वेच्या सर्वच स्थानकात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. कोकण रेल्वेच्या सर्वच महत्त्वाच्या स्थानकांवर विद्युत रोषण करण्यात आली असून गणेश भक्तांचे स्वागत केले जात आहे गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापर्यंत जाहीर केलेल्या नेमण्याहून अधिकार या कोकणात दाखल होत आहेत. एस. टी. महामंडळाच्या 5000 बस गणेश भक्तांसाठी सोडण्यात आले आहेत. चाकरमान्यांचे गर्दी पाहून खाजगी गाड्यांनाही आवश्यक दर आकारले आहेत.












