आमदार दीपक केसरकर यांच्याकडून दीड दिवसांच्या गणपतीचे पर्यावरणपूरक विसर्जन

​सावंतवाडी: माजी शालेय शिक्षणमंत्री आणि स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी त्यांच्या दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन कुटुंबियांसमवेत अत्यंत पर्यावरणपूरक पद्धतीने केले. शाडू मातीच्या मूर्तीचा वापर करून त्यांनी नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक कुंडांमध्ये विसर्जन केले.

​गणेशोत्सवाच्या काळात पर्यावरणाची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे, याचा संदेश देत आमदार केसरकर यांनी हा आदर्श घालून दिला आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “आमच्या घरातील श्री गणेश मूर्ती ही पूर्णपणे शाडू मातीची होती आणि पर्यावरणाची काळजी घेऊन आम्ही त्याचे विसर्जन नैसर्गिक कुंडांमध्ये केले.”
​यावेळी आमदार केसरकर यांच्यासोबत त्यांचे बंधू, पत्नी आणि घरातील इतर सदस्य उपस्थित होते. त्यांनी सर्वांनी मिळून पर्यावरणाचे रक्षण करण्याचे आवाहन केले.