जी. एम्. शेट्ये हायस्कूल सभागृह उद्घाटन सोहळा संपन्न

जी एम् शेट्ये हायस्कूल बसणी येथे आपली शाळा आपला सहभाग अभियान अंतर्गत सभागृह उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला.
आपली शाळा आपला सहभाग अभियान अंतर्गत नूतनीकरणकरण्यात आलेल्या जी. एम् शेट्ये हायस्कूलच्या सभागृहाचा उद्घाटन सोहळा 28/09/2025 रोजी संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संस्थापक कैलासवासी गणपत महादेव शेट्ये यांना अभिवादन करून झाली. माननीय संस्था अध्यक्ष अविनाश (भाऊ) शेट्ये यांच्या हस्ते फीत कापून सभागृहाचे उद्घाटन झाले. गुलाब पुष्प देऊन सर्व आजी-माजी विद्यार्थी आणि हितचिंतक यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्था पदाधिकारी श्री प्रसाद गवाणकर (बापू )यांनी केले.
आपल्या प्रास्ताविकात शाळेचे मुख्याध्यापक नाईक सर यांनी या अभियानात सहभागी झालेल्या सर्व माजी विद्यार्थी व हितचिंतक यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करताना हे नवीन सभागृह विविध उपक्रमांसाठी केंद्रबिंदू ठरणार आहे – प्रार्थनासभा, सांस्कृतिक कार्यक्रम, आणि सामुदायिक कार्यक्रम यांसारख्या अनेक उपक्रमांचे आयोजन येथे होईल. विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्यासाठी, आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि जीवनातील महत्त्वाच्या कौशल्यांचा विकास करण्यासाठी हे सभागृह व्यासपीठ ठरेल. आणि ज्या ज्या वेळी या सभागृहाचा वापर होईल त्या त्यावेळी आपल्या सर्व सहभागी देणगीदारांची आठवण येत राहील असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी आपली शाळा आपला सहभाग समितीचे अध्यक्ष श्री मारुती मयेकर यांनी सभागृह नूतनीकरणासाठी आलेला जमाखर्च सादर केला. आपली शाळा आपला सहभाग अभियानांतर्गत सभागृह सभागृह नूतनीकरण शाळेचे माजी विद्यार्थी श्री प्रकाश लोगडे यांच्या देखरेखी खाली झाले . कोणताही आर्थिक मोबदला न घेता श्री प्रकाश लोगडे यांनी नूतनीकरणाचे कार्य पूर्ण केल्याचे आपली शाळा आपला सहभाग समितीचे अध्यक्ष श्री मारुती मयेकर यांनी सांगितले.
नूतनीकरणाचे काम अतिशय उत्कृष्टरित्या पूर्ण केल्याबद्दल संस्थेच्या वतीने श्री लोगडे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन श्री प्रवींद बिरादार साहेब जिल्हा कोषागार अधिकारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
त्याचबरोबर शाळेचे माजी विद्यार्थी व आपली शाळा आपला सहभाग समितीचे अध्यक्ष श्री मारुती मयेकर यांनी दिलेल्या योगदानाबद्दल माजी विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात श्री मारुती मयेकर यांचाही सन्मान शाल श्रीफळ व बुके देऊन संस्था अध्यक्ष भाऊ शेट्ये यांच्या हस्ते करण्यात आला.
आपल्या मानोगतात जिल्हा कोषागार अधिकारी श्री बिरादार साहेब यांनी आम्ही देणगीदार म्हणून दिलेल्या देणगीचे सोने झाले त्याबद्दल आम्ही देणगीदाराच्यावतीने हे कार्य पूर्णत्वास नेणाऱ्या सर्वांचे कौतुक करत आहोत या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आणि या कार्यासाठी अपूर्ण राहिलेला निधीही लवकरात लवकर पूर्ण व्हावा अशी इच्छा व्यक्त केली
आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष एडवोकेट अविनाश (भाऊ) शेट्ये यांनी सर्व देणगीदारांना धन्यवाद देताना आपण या सर्वांच्या ऋणात राहणे पसंत करू अशा भावना व्यक्त केल्या. गेल्या वर्षी आपली शाळा आपला सहभाग अभियानाची सुरुवात झाली त्यावेळी सभागृहाचे नूतनीकरण करण्याचे ठरले आणि आपले सहभाग आपली शाळा समितीचे अध्यक्ष श्री मारुती मयेकर आणि सचिव श्री नाईक सर यांनी सूक्ष्म नियोजन करून निधी संकलन आणि सभागृह नूतनीकरण यशस्वीरित्या एक वर्षाच्या आत पूर्ण केल्याबद्दल त्यांचे व संपूर्ण कार्यकारणीचे अभिनंदन केले. त्याचबरोबर प्रति महिना 100 रुपये देणगी देणाऱ्या दात्यांचाही सन्मान झाला पाहिजे असे मत व्यक्त केले आणि म्हणून आज आपण माजी विद्यार्थी व समितीचे अध्यक्ष श्री मारुती मयेकर यांचा सन्मान केला असल्याचे त्यांनी नमूद केले. हा सन्मान प्रातिनिधिक स्वरूपात सर्व देणगीदारांचा असल्याचे संस्था अध्यक्षांनी सांगितले.
शेवटी आभार व्यक्त करत असताना संस्था पदाधिकारी श्री बापू गवाणकर यांनी सर्व देणगीदारांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली व आपल्याकडे शब्द नसल्याची भावना व्यक्त केली. उपस्थित सर्व संस्थेचे पदाधिकारी आजी-माजी विद्यार्थी आणि हितचिंतक यांना धन्यवाद देऊन कार्यक्रमाची सांगता झाल्याचे जाहीर केले. याप्रसंगी संस्था उपाध्यक्ष श्री मोहन धांगडे, सरपंच सौ समृद्धी मयेकर संस्था सचिव श्री विलास भोसले, खजिनदार श्री प्रकाश मयेकर, श्री मुकेश शेट्ये, माजी विद्यार्थी श्री श्रीकांत पाटील, श्री बळवंत पटवर्धन ,श्री वसंत राणे , श्री सुमित राणे , श्री जोशी, श्री प्रकाश शिवलकर , श्री मिलिंद बनप, माजी शिक्षक श्री करवडे सर, श्री सागर शेट्ये, कु. विघ्नेश वायंगणकर, कु अक्षता नाईक, सौ सुनिता गावडे, सौ. अनिता नाईक आणि माजी विद्यार्थी, हितचिंतक उपस्थित होते.