लोकमान्य वाचनालय लांजा येथे वाचन प्रेरणा दिन, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा आणि ग्रंथ प्रदर्शन ‘ उत्साहात साजरा

लांजा (प्रतिनिधी) : लोकमान्य वाचनालय लांजा आणि डि.जे. सामंत इंग्लिश मिडीयम स्कूल लांजा यांचे संयूक्त विद्यमाने ‘वाचन प्रेरणा दिन, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा आणि ग्रंथ प्रदर्शन ‘ उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून लोकमान्य वाचनालयाचे सल्लागार विजय बेर्डे, वाचनालयाचे उपाध्यक्ष योगेश वाघधरे, संचालिका ललिता भिंगे, ग्रंथपाल रामचंद्र लांजेकर, सहकारी शुभम नागवेकर तसेच स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य दत्तात्रय देसाई श्री. कामत, श्री.रमाकांत सावंत आणि प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.वैशाली सातपुते , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून आणि प्रमुख अतिथी व मान्यवरांच्या स्वागताने झाली. प्रमुख अतिथींच्या हस्ते वाचन कट्टा व ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम.सुकन्या पाध्ये, व सौ. तन्मयी पाध्ये यांनी केले.

लोकमान्य वाचनालय आयोजित सुंदर हस्ताक्षर स्पर्धा निकाल जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत तीन गटांत विभागणी केली होती. पहिला प्राथमिक गट प्रथम क्रमांक अवनी भास्कर कुंभार, द्वितीय क्रमांक अलिजा वसिम अहमद, तृतीय क्रमांक अरसलान सज्जाद नेवरेकर , तसेच माध्यमिक गटातील पाचवी ते सातवी गटात प्रथम क्रमांक विधी शिंगये,द्वितीय क्रमांक विराज संदिप निवळे, तृतीय क्रमांक ईशा रविंद्र जोशी, तर आठवी ते दहावी गटात प्रथम क्रमांक स्वरा चरकरी,द्वितीय क्रमांक रचना तांबे, तृतीय क्रमांक विभागून झोया नेवरेकर, अफजा नेवरेकर , या विद्यार्थ्यांना मिळाले. बक्षिस वितरण उपस्थित प्रमुख अतिथी व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या बक्षिस वितरण कार्यक्रमानंतर
वाचनालयाचे माजी उपाध्यक्ष विजय बेर्डे यांनी डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जीवन चरित्र आणि वाचन प्रेरणा दिन विषयी मार्गदर्शन केले .शाळेचे विद्यार्थी स्वरा जोशी , अर्श नेवरेकर , जुवेरिया कासु, अयमन ठाकूर या विद्यार्थ्यांनी वाचन महत्व आणि डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम विषयी माहिती आणि त्यांचे विचार भाषणाच्या माध्यमातून व्यक्त केले.मारिया नेवरेकर हिने ‘किताबे’ या विषयावर छोटीशी कविता सादर केली. त्यानंतर स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. कामत यांनी ‘वाचनाचे महत्व’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. उपस्थित वाचनालयाच्या संचालिका सौ .भिंगे यांनी आपल्या भाषणातून आजच्या दिवसाचे महत्त्व स्पष्ट केले. आपल्या अनमोल मार्गदर्शनपर भाषणातून प्रमुख अतिथींनी मनोगत व्यक्त केले.त्यांनी प्रशालेच्या वाचनालयास १००० /- रुपयांची पुस्तके घेण्यासाठी देणगी दिली. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.वैशाली सातपुते यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम.सुकन्या पाध्ये, व सौ. तन्मयी पाध्ये यांनी केले.

या कार्यक्रमास शाळेचे शिक्षक विद्यार्थी वाचनालयाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.