देवगड महाविद्यालयात होणार प्रक्षेपण
देवगड : देवगड तालुक्याचे सुपुत्र अमित सत्यवान जामसंडेकर यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्ती पदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या शपथविधी समारंभाचे थेट प्रक्षेपण आज मंगळवार, दि. २ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४.०० वाजता देवगड कॉलेज येथे होणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन शिक्षण विकास मंडळ, देवगड तर्फे करण्यात आले असून मोठ्या संख्येने नागरिक, मान्यवर व विद्यार्थी या सुवर्णक्षणाचे साक्षीदार होणार आहेत.
एका खेड्यातून, देवगडच्या लाल मातीतील व्यक्तीने बुद्धी आणि कष्टाच्या जोरावर एवढ्या उच्च पदावर पोहोचणे हा देवगडकरांसाठी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण ठरणार आहे. असे संस्थेचे अध्यक्ष एकनाथ तेली यांनी सांगितले











