चिपळूण : कडवई येथील पाटील वाडी मधील चंद्रकांत जाधव आणि जाधव परिवार मागील १०९ वर्षाची परंपरा जपत गणेशोत्सव साजरा करीत आहेत २०१६ पूर्वी जाधव कुटुंबीयांचा गणपती अनंत चतुर्दशी पर्यंत असायचा २०१६ नंतर या कुटुंबीयांनी वेगळेपण जपत २१ दिवसाचा गणेशोत्सव साजरा करण्याची सुरुवात केली आहे. या दिवसात ते विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम आणि आनंद सोहळे साजरे करतात. सुमारे साडेचार फुटाची भव्य गणेश मूर्ती सारेगम लिटिल चॅम्पचे प्रसिद्ध गायक प्रथमेश लगाटे यांच्या कलाश्री गणेश मूर्ती केंद्र आरवली येथे ही देखणी मूर्ती साकारण्यात आली आहे.
१६ सप्टेंबर रोजी जाखडी नृत्य शक्तीतुरा यासह सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला शिवसेना नेते माजी मंत्री आ.भास्कर जाधव, शिवसेना सचिव माजी खासदार विनायक राऊत,रत्नागिरी जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख सहदेवजी बेटकर उपस्थित राहणार आहेत कडवई पाटीलवाडी मधील ज्येष्ठ शिवसैनिक चंद्रकांत जाधव आपल्या निवासस्थानी त्यांच्या आजोबांपासून सुरू असलेली गणेशोत्सवाची परंपरा जपत मोठ्या आनंदाने गणेशोत्सव साजरा करीत आहेत संपूर्ण जाधव कुटुंबीय एकत्र येत हा उत्सव साजरा करतात पूर्वी अनंत चतुर्दशी पर्यंत गणरायाची सेवा केली जात असे परंतु २०१६ रोजी जाधव यांच्या घरातील गणेशोत्सवाला १०० वर्ष पूर्ण झाली यानंतर जाधव कुटुंबीयांनी गणपती २१ दिवस घरी विराजमान करण्याचा निर्णय घेतला. २१ दिवसाचा गणपतीचे २३ वे वर्षभजन नृत्य,कलाविष्कार,कीर्तन या सह २१ दिवसांमध्ये विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन असते.मंगळवार दि.१६ सप्टेंबर रोजी गणपती उत्सवाच्या २१ व्या दिवशी मंगळवार दि.१६ सप्टेंबर रोजी जाखडी नृत्य शक्तीतुरा यासह सत्कार ,महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच दिवशी रात्री ११ वा.शाहीर रत्नाकर महाकाळ,पुनम आगरकर यांच्या शक्ती तुरा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ शिवसैनिक चंद्रकांत जाधव, कल्याण शिवसेना उपशहर प्रमुख विश्वनाथ जाधव, सूर्यकांत जाधव,प्रभाकर जाधव,माजी उपसरपंच संतोष जाधव, माजी तंटामुक्ती अध्यक्ष महेंद्र जाधव,जगन्नाथ जाधव,सचिन जाधव, शांताराम जाधव आदी मंडळी गणेशोत्सव काळात संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतात.













