कृषी विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या योजना

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण 54 हजार हेक्टर इतके क्षेत्र खरीप व रब्बी पिकाखाली आहे. 1 लाख 88हजार इतके क्षेत्र फळपिकाखाली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी कृषी, आत्मा विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येत आहेत.*
*महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना* – सन २०२४-२५ मध्ये या योजनेअंतर्गत एकूण १३६० हे. क्षेत्रावर विविध फळपिकांची लागवड करण्यात आली आहे. तसेच सन २०२५- २०२६ मध्ये आजपर्यंत एकूण ११३२.३० हे. इतक्या क्षेत्रावर फळबाग लागवड पूर्ण झालेली आहे.
*प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना-* पी एम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण २० हप्त्यांचे वितरण शासनाकडून झाले असून जिल्ह्यात शेतकऱ्यांना ७०४.७९ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. तसेच २ ऑगस्ट रोजी २० वा हफ्ता वितरणाद्वारे जिल्ह्यातील १,६१,३९४ शेतकऱ्यांना ३४.७८ कोटी निधी वितरित करण्यात आला.
*नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना-* या योजनेअंतर्गत एक लाख ६० हजार शेतकऱ्यांना सहा हप्त्यांमध्ये रक्कम रुपये १८८.२३ कोटी निधी शासनाकडून लाभार्थ्यांच्या खाती जमा करण्यात आले आहेत.
*हवामान आधारीत फळपीक विमा योजना-* आंबिया बहार २०२३-२०२४ करिता आंबा व काजू पिकाकरिता फळ पीक विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांना ७९.१८ कोटी नुकसान भरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या खाती जमा करण्यात आलेली आहे. तसेच सन २०२४-२०२५ करिता ३६४६८ शेतकऱ्यांनी १८०२५ हे. क्षेत्राकरिता आपल्या आंबा व काजू फळपिकाकरिता फळ पीक विमा उतरविला आहे.
*खरीप पीक विमा-* २०२४-२०२५ या योजनेत ९८८ शेतकऱ्यांना ६८.६१ लक्ष नुकसान भरपाई मंजूर झाली आहे.
*गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना-* जिल्ह्यात सन २०२४ २०२५ मध्ये १२३ शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजूर करुन रक्कम रु. २४५ लक्ष अनुदान त्यांच्या खाती जमा करण्यात आले आहेत.
*नैसर्गिक आपत्ती-* अंतर्गत सन २०२४-२५ मध्ये ५८२.२७ हे क्षेत्रासाठी ४४८८ शेतक-यांना ११९.०४ लक्ष नुकसान भरपाई रक्कम अदा करण्यात आली आहे.
या वर्षी या योजनेअंतर्गत *एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान कार्यक्रम-* महाडिबीटीद्वारे रक्कम रु. २४ लाख संबंधित शेतक-यांच्या खाती जमा करण्यात आलेली आहे.
*ठिबक व तुषार सिंचन योजना -* सन २०२५-२६ मध्ये १२५ शेतकऱ्यांची निवड झाली आहे. *कृषी यांत्रिकीकरण योजना -* यावर्षी या योजनेत २१३ शेतक-यांना रक्कम रु. ४५.४६ लक्ष अनुदान वितरीत करण्यात आलेले आहे.
*डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन योजना -* जिल्ह्यात या योजनेत ११० सेंद्रिय उत्पादक गटांची स्थापना करुन ११ शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापित होणार आहेत. तसेच नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत ५२ गटांची स्थापना करण्यात आली.
*प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योग योजना -* जिल्ह्यात आजपर्यंत ३९३ प्रक्रिया उद्योगांना रुपये १४४३.१२ लाख अनुदान वितरीत करण्यात आले आहे.
*प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योग योजना –* जिल्ह्यात ३० महिला स्वयं सहाय्यता गट व शेतकरी गट यांना रुपये ७५.४० लाख अनुदान वितरीत करण्यात आले आहे. व सिंधुरत्न समृद्ध योजने अंतर्गत ८.१२ लाख अनुदान वितरीत करण्यात आले आहे.
*प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योग योजना -* जिल्ह्यात सामाईक पायाभूत सुविधा अंतर्गत ०५ शेतकरी उत्पादक कंपनी व संस्था यांना २६२.१३ लाख अनुदान वाटप करण्यात आले आहे व सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत ११८.७५ लाख अनुदान वितरीत करण्यात आले आहे.
*मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प -* १४ प्रकल्पांना मान्यता देण्यात आली असून ६ शेतकरी उत्पादक कंपनी शेतकऱ्यांचे प्रकल्प रक्कम १३९५.६८ लाख असून त्यांना प्रकल्प उभारण्याकरिता २४३.२७ लाखाचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे.
*मुख्यमंत्री कृषी व अन्नप्रक्रीया योजना -* जिल्ह्यात ०४ प्रकल्पांना ६९.२५ लाख अनुदान रक्कम वितरीत करण्यात आली असून २ प्रकल्प प्रस्ताव प्रगतीपथावर आहेत. *जिल्हा नियोजन निधी – सन २०२५-२६ नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्याच्या शेतक-यांना भात व नाचणी बियाणे वितरण प्रात्यक्षीक योजनेअंतर्गत ४४ लाख १९ हजार रकमेचे भात बियाणे वितरण ६६०६६ किलो. लाभधारक शेतकरी ३५००, नाचणी बियाणे वितरण ४३५२ किलो, लाभधारक शेतकरी २००० आहेत व आदिवासी शेतकरी बांधवांना तूर बियाणे वितरण ५०० किलो, लाभधारक शेतकरी ५०० आहेत.
– प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते
जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी