प्रलंबित मोजणी प्रकरणांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

राजापूर, लांजा, चिपळूण, रत्नागिरी तालुक्यातील प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढा – एम देवेंदर सिंह

*रत्नागिरी, दि. ३ – प्रलंबित मोजणी प्रकरणे तातडीने निकाली काढा, अशी सूचना जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी यांनी आज दिली.*
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख तसेच सर्व अधिनस्त उप अधीक्षक भूमी अभिलेख यांची आढावा बैठक झाली. बैठकीला अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा अधीक्षक भूमी अधीक्षक सचिन इंगळी यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, प्रलंबित मोजणी प्रकरणे विशेषतः राजापूर, लांजा, चिपळूण आणि रत्नागिरी तालुक्यातील प्रलंबित मोजणी प्रकरणे तातडीने निकाली काढा. भूमी संपादन मोजणी कामाचा आढावा घेऊन, ते अशा प्रकरणांबाबत मुदतीत आवश्यक कार्यवाही करावी.
प्रलंबित बिनशेती मोजणी प्रकरणाबाबत कजाप चाही आढावा घेतला. ही प्रलंबित प्रकरणे त्वरित निर्गत करावीत. त्यासाठी आवश्यकता आसल्यास तहसीलदार, उपविभागीय आधिकारी यांची मदत घ्यावी, असेही ते म्हणाले.