मुणगे येथे 7 सप्टेंबर रोजी ‘ मायाजाल ‘ दशावतार नाट्यप्रयोग!

मसुरे | झुंजार पेडणेकर : देवगड तालुक्यातील मुणगे येथील ग्रामदैवत श्री भगवती देवालयातील सार्वजनिक गणेशोत्सवा निमित्त 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता ‘ मायाजाल ‘ हा दशावतार नाट्य प्रयोग होणार आहे. श्री देवी भगवती पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ मुणगे – मुंबई डोंबिवली आयोजित कै. आबा लब्दे यांच्या स्मरणार्थ श्री प्रकाश पांडुरंग लब्दे प्रस्तुत हा दशावतार नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. उपस्थितीचे आवाहन श्री देवी भगवती देवस्थान मुणगे यांच्या वतीने करण्यात आले आहे.