फोंडाघाटच्या न्यू इंग्लिश स्कूलचा जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजय

आता विभागस्तरीय स्पर्धेत करणार सिंधुदुर्गचे प्रतिनिधित्व

फोंडाघाट | कुमार नाडकर्णी —        क्रीडा व युवक सेवा संचलनाय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग द्वारा क्रीडा संकुल सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज,फोंडाघाटच्या 14 वर्ष वयोगट मुलांच्या संघाने विजेतेपद पटकावले.हा विजेता संघ रत्नागिरी येथे होणाऱ्या कोल्हापूर विभागस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.

विजेत्या संघातील खेळाडू आणि मार्गदर्शक शिक्षक श्री.ए.व्ही.पोफळे यांचे फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी ,शाळा समिती चेअरमन, व संचालक मंडळ, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.पी.के.पारकर, पर्यवेक्षक श्र.व्ही.पी.राठोड,शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन केले व विभागस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.