मुणगे श्री भगवती देवालय सार्वजनिक गणेशोत्सवाची 16 सप्टेंबरला सांगता     

मसुरे | झुंजार पेडणेकर :देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती देवी मंदिर येथे प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या २१ दिवसांच्या गणेशोत्सवानिमित्त देवस्थान ट्रस्टच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज ८ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वा. बाळा सावंत दशावतार नाट्यमंडळ, नेरूर असरोंडी यांचे पौराणिक नाटक ‘भक्तीमहिमा’, ११ रोजी रात्री ९.३० वाजता रिक्षा चालक-मालक संघ, व्यापारी आणि मित्रमंडळ यांच्यावतीने दुर्गाई फुगडी मंडळ, कातवण-देवगड यांचे फुगडी नृत्य, १२. रोजी रात्री ९.३० वा. माऊली वारकरी दिंडी भजन, मोर्वे देवगड यांचे दिंडी भजन, १४ रोजी सकाळी १० वा. श्री सत्यनारायणाची सार्वजनिक महापूजा, ११.३० वा. श्रींची महाआरती, १२ वा. पासून तीर्थप्रसाद, सायंकाळी ४ वा. पासून स्थानिक भजने, ७.३० वा. श्री भगवती देवस्थान मुणगे आयोजित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निमंत्रित भजन मंडळांच्या जिल्हास्तरीय भजन स्पर्धा होणार आहेत. यात चिंतामणी प्रासादिक भजन मंडळ-सुरंगपाणी-वेंगुर्ले (बुवा अनिकेत भगत), महापुरुष भजन मंडळ, पिंगुळी कुडाळ (बुवा आमडोसकर), श्री गांगो रामेश्वर भजन मंडळ, पोयरे-देवगड (बुवा जयेश घाडी), श्री जैतीर भजन मंडळ तुळस वेंगुर्ले (बुवा सिद्धेश नाईक), श्री विश्वकर्मा प्रासादिक भजन मंडळ, राठिवडे मालवण (बुवा अक्षय परुळेकर), श्री काळंबादेवी प्रासादिक भजन मंडळ, कुणकेश्वर वरचीवाडी-देवगड (बुवा अतुल मेस्त्री) आणि रामकृष्ण हरी सेवा संघ पाट पंचक्रोशी-वेंगुर्ले (बुवा आशिष सडेकर) हे स्पर्धेत सहभागी होणार आहेत. १५ रोजी-रात्री स्थानिक भजने, १६ रोजी दुपारी १.३० वा. श्रींच्या मूर्तीची विसर्जन मिरवणूक निघणार आहे. कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन देवी भगवती देवस्थान समिती व देवी भगवती देवस्थान गणेशोत्सव मंडळाने केले आहे.