
लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील भांबेड पेठदेव येथील नवयुग उत्कर्ष युवक मंडळाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय लेख लेखन स्पर्धेत राधा ऋषिकेश बेर्डे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
मंडळाचा ४४ वा सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात संपन्न झाला. यानिमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने पत्रकार स्वर्गीय जगदीश कदम जिल्हास्तरीय लेख लेखन स्पर्धा घेण्यात आल्या. त्यांचा बक्षीस समारंभ नुकताच संपन्न झाला. यामध्ये जिल्ह्यातून २४ स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. यामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त राधा ऋषिकेश बेर्डे यांनी पटकावला. त्यांना रोख १५०० व चषक प्रमाणपत्र देण्यात आले. द्वितीय क्रमांक दिलीप शंकर चव्हाण यांस रोख १००० व चषक प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक विभागून श्रेया वैभव कोरगांवकर, आफरीन आरिफ शेख यांस रोख ७५० व चषक प्रमाणपत्र अशी बक्षिसे देण्यात आली.
उत्तेजनार्थ विशाल निवृत्ती मोरे, ऐश्वर्या दिनेश शिंदे यांस प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवयुग उत्कर्ष युवक मंडळ भांबेड पेठदेव येथील सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.











