लांजा( प्रतिनिधी) कुणबी सेवा संघ लांजा, दापोली आणि अश्विनी ऍग्रो फार्म, दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत फळझाड वाटप कार्यक्रम नुकताच ग्रामपंचायत कार्यालय, आसगे येथे पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात आसगे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य विश्वास मांडवकर यांनी सूत्रसंचलनाने केली. त्यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर कुणबी सेवा संघ लांजाचे अध्यक्ष शांताराम गाडे, सचिव अशोक कातकर, खजिनदार ॲड. स्मिता मांडवकर, सहसचिव विलास दरडे, सदस्य सीताराम पालकर, प्रकाश जोशी, कुलकर्णी काळे छात्रलयाचे अधिक्षक अजय नेमण, आसगे गावच्या सरपंच सौ अनुष्का गुरव, उपसरपंच अनिल देसाई, ग्रामसेविका सौ पूजा डावरे व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते .
संस्थेच्या खजिनदार ॲड. स्मिता मांडवकर यांनी संस्थेची माहिती आणि संस्थेचे उपक्रम याबद्दल सविस्तर माहिती दिली. सदस्य सीताराम पालकर यांनी संस्थेच्या फळ व्यवसायाबद्दल तसेच वधू वर सूचक मंडळ याविषयी माहिती दिली. संस्था सचिव विलास दरडे यांनी संस्थेच्या कामकाजावर माहिती दिली. कुणबी सेवा संघ लांजाचे अध्यक्ष शांताराम गाडे यांनी मनोगत व्यक्त करताना छात्रालयामध्ये मुलांना प्रवेश घेण्याचे आवाहन केले. तसेच गावातील वधूवर यांनी वधुवर सुचक मंडळामध्ये नाव नोंदणी करण्याचे आवाहन केले. आभार संस्था सचिव अशोक कातकर यांनी मानले.
या कार्यक्रमाला आसगे गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ रामचंद्र टोळे,, पांडुरंग चौगुले, काशीराम मांडवकर, सुभाष मांडवकर, प्रकाश टोळे ,अनिल कांबळे, प्रभाकर टोळे, शंकर मांडवकर ,विकास मांडवकर, दिलीप दाभोळकर , नांदिनी कांबळे, वैशाली दाभोळकर व अन्य उपस्थित होते.












