ओटवणे शेरवाळवाडी परिसरात कोल्ह्याचा मुक्त संचार.

ओटवणे (प्रतिनिधी ) सध्या दुर्मिळ होत चाललेली आणि नष्ट होण्याच्या मार्गांवर असणाऱ्या कोल्ह्याच्या प्रजातीचा मुक्त संचार ओटवणे परिसरात पहायला मिळत असून आज बुधवारी दुपारी हा प्राणी रस्त्यावरून एखाद्या पाळीव प्राण्यासारखा बिनधास्त फिरताना ग्रामस्थांच्या नजरेस आढळून आला.या मार्गातून जाणारे ओटवणे पोलीस पाटील शेखर गावकर यांना हा व्हिडिओ काढण्याचा मोह आवरता आला नाही त्यांनी हा व्हिडिओ काढला.आणि सोशल मिडियावर व्हायरल केला. नेमका हा प्राणी कोल्हा की पूर्वी कोळसुंडे म्हणून ओळखली जाणारी आणि जंगली प्राण्यांची, शिकार करणारी जंगली कुत्र्याची जात यावर मतमतांतर होते मात्र अनेक जणांनी हा व्हिडिओ बघितल्या नंतर यातील जंगली प्राणी हा कोल्हाच असल्याचा निष्कर्ष काढला.अनेक प्रजाती सध्या दुर्मिळ होत चालल्या नष्ट होत चालल्या अस असताना अशा जंगली प्राण्यांचे होणारे दर्शन म्हणजे या दुर्मिळ होत चाललेल्या प्राण्यांचं अस्तित्व अजूनही असल्याचे सिद्ध होत आहे.