गोरबंजारा समाजाच्या गोरसेना या संघटनेच्यावतीने अधिकाऱ्यांना निवेदन
कणकवली : महाराष्ट्रातील बंजारा तत्सम जमातीला अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश केल्याच्या शिफारसी समवेत हैदराबादचे गॅझेट लागू केल्याची अधिसूचना निर्गमित करून अनुसूचित जमातीच्या आरक्षण टक्केवारीत (विजा-अ) ची टक्केवारी स्वतंत्रपणे समावेश करणारी राज्य शासनाची स्पष्ट शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात यावी, अशी मागणी गोरसेनेच्यावतीने करण्यात आली.
याबाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी तहसीलदार, प्रांताधिकारी यांच्याकडे देण्यात आले.
यावेळी सुनील राठोड, राहूल राठोड, श्याम पवार, आकाश चव्हाण, संतोष पवार, अनिता राठोड, सुनिता राठोड, अनिता जाधव, सविता आडे, सविता पवार, ज्योती जाधव, गजानन राठोड, मनीष जाधव, तालुबाई चव्हाण, राजेश पवार आदी उपस्थित होते.













