सावंतवाडी इनरव्हील क्लबतर्फे २३ ते २५ डिसेंबर रोजी ‘इनरव्हील महोत्सव’

Google search engine
Google search engine

 

जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यान येथे आयोजन

खाद्य संस्कृतीसह नृत्य व सौंदर्य स्पर्धेचा नजराणा

सावंतवाडी । प्रतिनिधी :

इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीच्या माध्यमातून २३, २४, २५ डिसेंबर रोजी जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यान, सावंतवाडी येथे “इनरव्हील महोत्सव” आयोजित करण्यात आला आहे. कोरोना काळानंतर प्रथमच अशा प्रकारचा महोत्सव आयोजित होत असल्याने सर्व स्तरातून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल असा विश्वास इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा दर्शना रासम यांनी व्यक्त केला.

या महोत्सवात मनोरंजनासाठी ‘पद्मश्री पुरस्कार प्राप्त’ परशुराम गंगावणे यांचा कठपुतली शो, सोलो रेकॉर्ड डान्स स्पर्धा, ग्रुप डान्स स्पर्धा, स्टॅच स्पर्धा तसेच ‘इनरव्हील क्वीन’ ही स्पर्धा महिलांसाठी आयोजित केली आहे. या महोत्सवातील विजेत्यांसाठी आकर्षक बक्षीसेही आयोजित केली आहेत. त्याचप्रमाणे ‘लकी ड्रॉ’ कुपन’ हे महोत्सवाचे आणखी एक आकर्षण असेल.

सेवा आणि मैत्री म्हणजेच मैत्री करता करता समाजाला सेवा देणे हा उद्देश घेऊन काम करणाऱ्या इनरव्हील क्लबच्या माध्यमातून गेली ४० वर्षे अनेक समाज उपयोगी व सामाजिक उपक्रम राबविण्यात येत होते. यात आरोग्य शिबिर, जयपुर फूट वाटप, मोफत चष्मा वाटप अशा उपक्रमांचा समावेश होता. इनरव्हीलच्या ४० सदस्य महिला कार्यरत असून आता शहरातून ग्रामीण भागात इनरव्हील ची व्याप्ती वाढविण्याचा आमचा मानस आहे. हे सर्व उपक्रम कोणताही फंड न घेता स्वखर्चातून सुरू असून प्रथमच इनर व्हेल क्लबच्या माध्यमातून इनरव्हील महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

या महोत्सवात आयोजित सोलो डान्स स्पर्धा ही दोन गटांत होणार असून त्यात ८ ते १४ व १५ वर्षावरील अशा दोन गटात ही स्पर्धा होणार आहे तर यासाठी १८ डिसेंबर रोजी रोटरी हॉलमध्ये प्राथमिक घरी होणार असून या दोन्ही गटातून प्रत्येकी १५ जण निवडून मुख्य स्पर्धेत सहभागी होणार आहेत. तर ग्रुप डान्स स्पर्धा ही खुली असून त्यात बारा वर्षांवरील सर्व स्पर्धक महिला सहभागी होऊ शकतील. स्टॅच्यू स्पर्धा देखील खुली असून ८ वर्षांवरील स्पर्धक त्यात सहभागी होऊ शकतील.

विशेष म्हणजे या वर्षीचे खास आकर्षण म्हणून ‘इनरव्हील क्वीन ‘ स्पर्धा आयोजित करण्यात आली असून यासाठी ३० ते ५० वयोगटातील महिलांना सहभाग घेता येणार आहे. ही स्पर्धा २५ डिसेंबर रोजी होणार असून या सर्व स्पर्धांसाठी नामा मात्र प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. शहरासोबतच गावातील महिलांमध्ये जागृती करण्याचा आमचा मानस असून जास्तीत जास्त महिलांनी या स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

याच बरोबर कोरोना काळात उद्योगधंद्यात आलेल्या मंदीनंतर जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील लघु उद्योजकांना स्टॉलच्या माध्यमातून व्यवसायाची एक उत्तम संधी उपलब्ध होत आहे. या महोत्सवात विविध प्रकारच्या स्टॉलची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच या महोत्सवाला सावंतवाडीतील, आजुबाजूच्या गावातील आणि पर्यटक मिळून १० ते १५ हजार लोक भेट देतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

तसेच स्टॉलच्या माध्यमातून उद्योजकांसाठी ही सुवर्णसंधी असून इच्छुक व्यावसायिकांनी स्टॉलसाठी रिया रेडीज ९४२२०७६७२१,

सोनाली खोर्जुवेकर ९४२२०७६७४५, शकुन म्हापसेकर ९४०५९२५७०२, व ममता पाटणकर

९४०३०७३६११ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी इनरव्हील अध्यक्षा दर्शना रासम, सेक्रेटरी भारती देशमुख, सुमेधा नाईक, देवता हावळ, डॉ. शुभदा करमरकर, डॉ. मीना जोशी व मृणालिनी कशाळीकर आदी उपस्थित होते.