अर्चनाताईंनी चिमुकल्यांसोबत साजरा केला वाढदिवस

Google search engine
Google search engine

सावंतवाडी । प्रतिनिधी :

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षा सौ.अर्चनाताई घारे-परब यांचा वाढदिवस १ डिसेंबर रोजी ऑल इंडिया मूव्हमेंट फॉर सेवा संचलित दयासागर छात्रालय रोणापाल येथील विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत अतिशय उत्साहात साजरा झाला.

अर्चना फाऊंडेशनच्या माध्यमातून या छात्रालयाला आवश्यक धान्य वाटप देखील या निमित्ताने करण्यात आले. २००७ साली सुरू झालेल्या या छात्रालयामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरीब आणि गरजू अशी एकूण ३० मुले-मुली शिक्षण घेत आहेत. ज्यामध्ये १३ मुले आणि ७ मुली येथे निवासी राहून शिक्षण घेत आहेत. आजपर्यंत एकूण ३०० हुन अधिक विद्यार्थ्यांनी या छात्रालयातून शिक्षण घेतले आहे आणि यातील विद्यार्थी रेल्वे पोलिस, गोव्यातील नामवंत कंपनी तसेच डॉक्टर, इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत.

भविष्यात देखील या छात्रालयाला आवश्यक ती मदत केली जाईल असे अर्चनाताई घारे यांनी आश्वासन दिले.यावेळी ताईनी छात्रालयाच्या वार्डन रत्नप्रभा केळुसकर,केअरटेकर वैदही परब आणि व्यवस्थापाक श्री.त्रिवबा विर यांचे विशेष आभार देखील मानले.

यावेळी अर्चनाताई घारे यांच्यासोबत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी,महिला उद्योग व्यापार सेल जिल्हाध्यक्षा सौ.दर्शना बाबर देसाई, शहराध्यक्ष देवा टेमकर,सूरज खान आणि मंगल कामत सोबत इतर पदाधिकारी व कार्यकर्ते देखील उपस्थित होते.

Sindhudurg