लायन्स क्लब सावर्डे तर्फे माखजन येथे चित्रकला स्पर्धा

गौरव पोंक्षे माखजन
संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथे माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल येथे मेरा युवा भारत रत्नागिरी युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार व लायन्स क्लब सावर्डे,आयडियल द्वारा चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.
राष्ट्रीय क्रीडा दिवसाचे औचित्य साधून ही चित्रकला स्पर्धा झाली.या स्पर्धेत माखजन इंग्लिश स्कूल माखजन व इंग्रजी मिडीयम स्कूल सरंद च्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.एकूण ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
‘मोबाईल की मैदान ?’हा विषय ठेवण्यात आला होता.विद्यार्थ्यांमध्ये मैदानी खेळाची जनजागृती व्हावी यासाठी या विषयाची निवड करण्यात आली होती.
या स्पर्धेत विदिता मिलिंद मोने (प्रथम),निहार विनायक पाडळकर (द्वितीय),श्रेयस सुनिल गोटेकर(तृतीय) क्रमांक पटकावला.या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.यावेळी लायन्स क्लब तर्फे डॉ सौ वर्षा खानविलकर,अनिकेत जाधव,डॉ सौ पाटील,डॉ खानविलकर आदी तर माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष शशिकांत घाणेकर,सचिव दीपक पोंक्षे,सहसचिव दीपक शिगवण माखजन हायस्कुल चे मुख्याध्यापक महादेव परब,इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका श्रीमती धनश्री राजेसावंत भोसले,पर्यवेक्षक् अंबादास घाडगे, संतोष कुलकर्णी,अमोल पाटील,आदी उपस्थित होते.