डीबीजेचे प्रा.मधूसुदन माने यांचे सेट परीक्षेत सुयश

चिपळूण (प्रतिनिधी) : महाविद्यालयीन शिक्षकांसाठी महत्त्वाची असणाऱ्या सेट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत येथील नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयातील आय. टी. विषयाचे प्राध्यापक मधुसूदन माने यांनी सुयश प्राप्त केले. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्रा.मदुसूधन माने हे महाविद्यालयाच्या आय.टी. विभागात जवळपास २० वर्षे कार्यरत आहेत. अत्यंत शिस्तप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांची ओळख आहे. राष्ट्रीय छात्र सेना विभाग देखील ते सांभाळतात. नुकताच त्यांना लेफ्टनंट ही रॅंक मिळाली आहे. प्रा.माने हे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे डीबीजे युनिटचे सचिव म्हणून देखील काम पाहिले आहे. ‘कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड ॲप्लिकेशन’ या विषयातून ते सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. या यशाबद्दल नवकोंकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मंगेश तांबे, नियामक समिती सदस्य, प्राचार्य डॉ. माधव बापट, उपप्राचार्या प्रा.सौ. स्नेहल कुलकर्णी, पर्यवेक्षिका सौ. सुजाता खोत, रजिस्ट्रार अनिल कलकुटकी, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना, डीबीजे युनिट,महाविद्यालय शिक्षक-शिक्षकेतर, कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.