प्रभानवल्ली पं.स. गण बनतोय भाजपचा बालेकिल्ला

लांजा तालुका भाजपा युवा मोर्चा संयोजक संकेत घाग यांचे विशेष प्रयत्न

लांजा( प्रतिनिधी) लांजा तालुका भाजपा युवा मोर्चा संयोजक संकेत घाग यांच्यासह सर्व भाजपा पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली प्रभानवल्ली पंचायत समिती गण हा भाजपाचा बालेकिल्ला बनू लागला आहे
लांजा तालुक्याच्या पूर्व भागातील प्रभानवल्ली पंचायत समिती गणात भाजपाने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. येथील भाजपाचे तरुण उद्योजक आणि भाजपा युवा मोर्चाचे संयोजक संकेत घाग यांनी यांनी या प्रभानवल्ली पंचायत समिती गडावर मजबूत पकड निर्माण केली आहे. एकेकाळी शिवसेना ठाकरे गटाचे वर्चस्व असलेल्या या गणात भाजपाने आपली मजबूत पकड निर्माण केली आहे . ठाकरे गटाचे वर्चस्वाला सुरूंग लावून या ठिकाणी भाजपाचे पदाधिकारी असलेले संकेत घाग यांच्यासह तालुका सरचिटणीस सुनील गुरव, शशिकांत जाधव -सालपे बुथ अध्यक्ष, कोचरी बुथ अध्यक्ष संजय कांबळे तसेच मिलिंद घाग ,प्रत्युष घाग ,रुपेश घाग, संजय पोवार या सर्व भाजपा पदाधिकाऱ्यांनी प्रभानवल्ली पंचायत समिती गण पिंजून काढताना हर हर मोदी, घर घर मोदी अभियान या भागात यशस्वीपणे राबविले आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना येथील तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे. शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे.किंबहुना त्या जनतेपर्यंत पोहोचवण्यात हे सर्व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यशस्वी झाले आहेत.
अशाप्रकारे संकेत घाग यांच्या नेतृत्वाखाली सर्व भाजपा पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे या पंचायत समिती गणावर भाजपा पक्षाचे एक वर्चस्व तयार केले असून संपूर्ण पंचायत समिती गण हा भाजपामय करण्याचा मनोदय केला आहे.
भाजपाचे तालुकाध्यक्ष शैलेश खामकर, ,विराज हरमले यांनी देखील या सर्व पदाधिकाऱ्यांना चांगली साथ दिल्याने प्रभानवल्ली पंचायत समिती गण भाजपाने आपल्या वर्चस्वाखाली आणला आहे. आगामी काळातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीत यांचे चित्र दिसून येणार आहे.