राजापूर प्रतिनिधी :नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत राजापूर शहरातील जलतरण पट्टुनी आपला ठसा उमटवत विभागिय स्तरावर झेप घेतली आहे. हितेश शेलार , आदित्य हळदवणेकर व सार्थक वाघाटे या तिन जलतरण पट्टूंची विभागिय स्तरावर होणाऱ्या जलतरण स्पर्धांसाठी निवड झाली आहे. त्यांच्या या यशस्वी कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .
गेली आठ वर्ष बंद असणाऱ्या शहरातील मारुती मंदिर येथील तळीवर जलतरणचा सराव करणाऱ्या या तिनही जलतरण पट्टूनी विभागिय स्तरापर्यत मजल मारली आहे . राजापूर हायस्कूलचे शिक्षक कै . ए. जी. भावे यानी याच तळीवर फक्त पावसाळ्यात पाण्याची उपलब्धता असतानाच्या काळात मार्गदर्शन करुन शेकडो जलतरण पट्टूना घडवले होते . कै. भावे सरांच्या मार्गदर्शनाखाली राजापूरातील अनेक जलतरण पट्टूनी राज्यस्तरापर्यंत झेप घेतली होती . मात्र कै. भावे सरांच्या निधनानंतर गेली आठ वर्षे या तळीतील जलतरणचा सराव बंद होता मात्र यावर्षी कै . ए. जी. भावे यांच्या शिष्यानी पुढाकार घेत पुन्हा ही तळी जलतरणसाठी खुली केली होती . अनेक अडचणींचा सामना करत या कै. भावे सरांच्या शिष्यानी वेगवेगळ्या वयोगटातील मुलाना जलतरणचे प्रशिक्षण देण्याचे काम सुरु केले . मात्र मध्येच पावसाच्या विश्रांतीमुळे तळीतील पाणीसाठा कमी झाल्याने या सरावात अडचणी येत होत्या . त्यावर मात करत कधी शहरातुन वाहणाऱ्या कोदवली नदीच्या पात्रात तर कधी लांजा व रत्नागिरी येथील जलतरण तलावात स्वखर्चाने जलतरण पट्टूना नेत त्यानी या प्रशिक्षणात सातत्य राखण्यात यश मिळवले होते .
त्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत येथील हितेश सचिन शेलार 50, 100, 200 मीटर फ्री स्टाईल स्पर्धेत प्रथम क्रमांक , आदित्य महेश हळदणकर 100 मीटर फ्री स्टाईल स्पर्धेत द्वितीय क्रमांक, 50 मीटर फ्री स्टाईल स्पर्धेत तृतीय क्रमांक ,100 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला आहे तर सार्थक सचिन वाघाटे 100, 200 मीटर बॅक स्ट्रोक प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवत विभागिय स्तरावर पोहोचले आहेत .
या तिनही जलतरणपट्टूंची विभागिय स्तरासाठी निवड झाल्याने त्यांचे व त्यांच्या प्रशिक्षक असणारे निकेत कुडाळी , निनाद शिरर्सेकर, उदय खडपे, देवेंद्र शेट्ये, प्रतिक डांगवे, तन्मय मोदी, आशुतोष पेडणेकर, निलेश कुडाळी, दीपक कोदलकर, युवराज माने यांचे अभिनंदन करण्यात येत आहे .
फोटो 15 आरजेपी 1
जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेतील विजेते व त्यांचे प्रशिक्षक













