प्रथम पारितोषिक २१००० रुपये : मुंबई, ठाणे, रायगड सह नामवंत भजन मंडळांचा समावेश
वेंगुर्ले : दाजी नाईक
भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त तुळस येथे “राज्यस्तरीय निमंत्रित भजन स्पर्धा प्रदेशाध्यक्ष चषक २०२५” ही स्पर्धा भव्य दिव्य अशा स्वरूपात १९ व २० सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे. सिंधुदुर्गात पहिल्यांदाच होत असलेल्या एवढया मोठ्या स्पर्धे मद्ये सिंधुदुर्ग सह मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील निमंत्रित नामवंत भजन संघ सहभागी होणार आहेत. विजेत्या प्रथम क्रमांक संघास रोख २१००० रुपये आणि आकर्षक चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. या सह विविध सांघिक आणि वैयक्तिक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
वैभव होडावडेकर मित्रमंडळ, भारतीय जनता पार्टी तुळस व भा.ज.यु.मो. वेंगुर्ला आयोजित ही स्पर्धा भारतीय जनता पार्टी प्रदेश अध्यक्ष श्री.रविंद्रजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आली आहे. दोन दिवस चालणारी राज्यस्तरीय ही भव्य दिव्य संगीत निमंत्रित भजन स्पर्धा उत्सव हॉल तुळस येथे होणार आहे. स्पर्धेत आकर्षक बक्षिसे सोबत प्रेक्षकांची भोजन व्यवस्था, उपस्थित प्रेक्षकांमधून भाग्यवान प्रेक्षक ह्यांना भेटवस्तू देण्यात येणार असून दोन दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजनप्रेमींना मंत्रमुग्ध करणारी संगीत भजनाचा आनंद लुटता येणार आहे. तसेच स्पर्धा संपल्यानंतर स्पर्धा परीक्षक श्री.दिप्तेश मेस्त्री ,श्री.मनिष तांबोसकर यांचा संगीत कार्यक्रम होईल.
दरम्यान स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम पारितोषिक – २१,०००/-रु.व चषक, व्दितीय पारितोषिक – १५,०००/-रु. व चषक, तृतीय पारितोषिक – ११,०००/-रु. व चषक, उत्तेकजनार्थ प्रथम – ७,०००/-रु. व चषक, उत्तेतजनार्थ व्दितीय – ५,०००/-रु.चषक, उत्तेनजनार्थ तृतीय – ३,०००/-रु. व चषक तसेच वैयक्तिक बक्षिसे उत्कृष्ट गायक – १,०००/-रु. व चषक, उत्कृष्ट पखवाज – १,०००/-रु.चषक, उत्कृष्ट तबला – १,०००/-रु.व चषक, उत्कृष्ट कोरस – १,०००/- रु व चषक, उत्कृष्ट झांजवादक – १,०००/-रु. व चषक, शिस्तबद्ध संघ- १,०००/-रु. व चषक, उत्कृष्ट हार्मोनियम – १,०००/-रु. व चषक, उत्कृष्ट गजर – १०००/-रु. व चषक, उत्कृष्ट गौळण – १०००/-रु. व चषक, उत्कृष्ट पखवाज तबला जुगलबंदी – १०००/-रु. व चषक अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तरी जास्तीत जास्त जास्त भजन रसिकांनी या स्पर्धेचा आनंद घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.












