रत्नागिरी :
रत्नागिरीतील कुणबी समाजनेते, पंचायत समितीचे माजी उपसभापती तसा संजय गांधी निराधार योजनो रत्नागिरी तालुका अध्यक्ष सुनील नावले यांचे सोमवारी दुःखद निधन झाले. येथील विविध सामाजिक कार्य, संघटन कार्यात सदैव अग्रणी असणारे हे व्यक्तीमत्व होते..
रत्नागिरी तालुक्यातील पावस दशक्रोशीत सुनील गोपाळ नावले (वय सुमारे 50) रा. नाळ-पावस हे सर्व परिचित होते. एक सुस्वभावी, साधी राहणी असे हे व्यक्तीमत्व होते. कुणबी समाज संघटन असो किंवा येथील विविध सामाजिक कार्यात ते सदैव अग्रणी होते. सामाजिक कार्याबरोबरा राजकीय क्षेत्रात ते सद्या क्रियाशील होते. सोमवारी सकाळी कुणबी समाजेन्नती संघ मुंबई, ग्रामीण शाखा रत्नागिरी यांच्या ओबीसी आरक्षण बाव आंदोलनातही अग्रणी सहभागी होते. या आंदोलन आटोपून ते आपल्या रत्नागिरीतील निवासस्थानी गेलेले होते.
मात्र निवासस्थानी असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे ते तपासणीसाठी रिक्षाने ाग्णालयात येत होते. यादरम्यान ते अत्यवस्थ झाल्याने ाग्णालयात तातडीने वैद्यकीय उपार सुरू करण्यात आले. पण त्यावेळी त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी घोषित केले. सर्वांशी संवाद साधून असलेला सहकारी आाानक गमावल्याने सर्वांना हळहळ व्यक्त केली.
पालकमंत्री उदय सामंत यों निकटवर्तीय म्हणून ते परिचित होते. त्यांया पश्चात पत्नी, दोन मुली, भाउ असा परिवार आहे.













