ओटवणे (पतिनिधी ) ओटवणे गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्षपदी पुनः एकदा सामाजिक कार्यकर्ते विद्यमान अध्यक्ष सगुण जयराम गावकर यांची एकमताने फेरनिवड करण्यात आली. ओटवणे ग्रामपंचायत येथे पार पडलेल्या ग्रामसभेत ही बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी सरपंच आत्माराम उर्फ दाजी गावकर, उपसरपंच संतोष कासकर, माजी सरपंच रवींद्र म्हापसेकर, ग्रामपंचायत अधिकारी निगाप्पा नाईक, कृषी सेवक स्वप्नील शिर्के, पोलीस पाटील लक्ष्मण गावकरआदी सह माजी ग्रा. सदस्य संतोष तावडे, प्रभाकर गावकर, गुरु बुराण,शशी गोसावी, संतोष काटाळे, गुरुनाथ बोर्ये, रमेश वरेकर, नारायण भानसे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सगुण गावकर यांनी आपल्या कारकिर्दीत घेतलेले निर्णय आणि आणि सोडविलेले तंटे याची दखल घेत पुनः एकदा ग्रामस्थानी त्यांच्यावर विश्वास दाखवत पुनः एकदा संधी दिली. उपस्थित सर्वांनी अभिनंदन करत सगुण गावकर यांचे अभिनंदन करत पुढील कारकिर्दी साठी शुभेच्छा दिल्यात. यावेळी सगुण गावकर यांनीही ग्रामस्थांचे आभार मानत गावातील असणारे छोटेमोठे तंटे गावातच मिटवत या पदा ला ज्ञाय देण्याचे आश्वासन दिले.











