रत्नागिरी ः प्रतिनिधी
तालुक्यातील कोतवडे येथे तरुणाने वेड्याचे भरात घराशेजारील विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. ही घटना सोमवार 9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6.30 वा.सुमारास उघडकीस आली.
साईनाथ नारायण बारगोडे (32,रा.कोतवडे उंबरवाडी,रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. साईनाथ याच्यावर मनोरुग्णालयात उपचार सुरु होते. सोमवारी सायंकाळी तो घरात कोणालाही न सांगता निघून गेला होता. साईनाथ घरामध्ये नसल्याचे लक्षात येताच त्याच्या नातेवाईकांनी त्याचा आजूबाजूला शोध घेतला असता त्यांना साईनाथ घराशेजारील विहिरीत पडलेला दिसून आला. त्यांनी त्याला विहिरीतून बाहेर काढत तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.











