मसुरे | झुंजार पेडणेकर मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५ या अभियाना अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय गोळवण _ कुमामे _ डिकवल येथे सकाळी खास ग्रामसभा आयोजित केली होती. जिल्हा पूर्ण प्राथमिक शाळा गोळवण नंबर १ च्या बालचमुनी स्वागत गीत सादर केले. यावेळी देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस साजरा करून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या ग्रामसभेमध्ये सरपंच यांच्या अध्यक्षते खाली मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान ग्रामस्थरीय समितीची स्थापना करण्यात आली. या समितीमध्ये ग्रामपंचायत उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, पोलिस पाटील, मुख्याध्यापक, ग्राममहसूल अधिकारी, कृषी सहाय्यक, वैद्यकीय अधिकारी, व ग्रामपंचायत अधिकारी यांचा समाविष्ट करण्यात आले.
यावेळी सरपंच सुभाष लाड यांनी उपस्थिताना अभियानाची माहिती देत आपले प्रास्ताविक सादर केले. ग्रामपंचायतसाठी नेमणूक करण्यात आलेल्या संपर्क अधिकारी सौ. आरती कांबळी यांनी अभियानाची माहिती, हेतू, व उद्दिष्ट समजावून सांगितली. ग्रामविस्तार अधिकारी श्रीम. प्रियंका विलासराव मनवर यांनी या अभियानात सर्वांना स्वेच्छेने सहभागी होण्याचे आवाहन केले. मंडळ अधिकारी श्री अजय परब यांनी फार्मर आयडी कार्ड, पाणंद रस्ते, ई _पीक पाहणी या संदर्भात माहिती दिली. ग्राममहसूल अधिकारी सौ. कोकरे मॅडम ई _ पिक पाहणी, फार्मर आयडी या संदर्भात आयोजित करण्यात येणाऱ्या कॅम्पमध्ये जास्तीत जास्त लोकांनी आयडी काढण्याबाबत आवाहन केले. मुख्याध्यापक श्री. संतोष पाताडे यानी हॉल सुशोभीकरण करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. मुंबईमंडळाचे ग्रामस्थ श्री. नाईक सर यांनी अभियानाची माहिती देत शुभेच्छा दिल्या तसेच रत्नागिरी पंचायत समितीचे सेवा निवृत्ती गटविकास अधिकारी श्री. संजय गोसावी यांनी उपस्थित सर्वांना सदर अभियानाबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामपंचायत गोळवण _ कुमामे _ डिकवलचे सरपंच श्री. सुभाष लाड, उपसरपंच श्री. शरद मांजरेकर, ग्रामपंचायत सदस्य सौ. प्राजक्ता चिरमुले, सौ. मेघा गावडे, सौ. विभा परब, शाळा मुखाध्यापक श्री. संतोष पाताडे, श्री. चेडगे सर, कृषी सहाय्यक नितेश पाताडे, मंडळ अधिकारी श्री अजय परब , ग्राममहसूल अधिकारी श्रीम. गौरी कोकरे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्री. प्रकाश चिरमुले. ग्रामपंचायत अधिकारी श्रीम. प्रियंका मनावर आरोग्य सेवक आशा स्वंयसेवका, अंगणवाडी सेविका, पोलिस पाटील, ग्रामसंघ अध्यक्ष, लिपिका, बचत गट CRP, ग्रामरोजगार सहाय्यक, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच गांव गोळवण, कुमामे व डिकवल गावातील सुमारे २१२ ग्रामस्थ उपस्थित होते.













