रत्नागिरी | प्रतिनिधी
रत्नागिरी शहरा नजीकच्या हातखंबा येथील हायस्कूल येथे ट्रक ने गाड्यांना ठोकर देऊन भीषण अपघात केला. यात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
यामध्ये 4 फोर व्हीलर गाड्या, एक तीन चाकी आणि तीन दुचाकी गाड्यांना या ट्रकने ठोकल्या असून हा भीषण अपघात झालेला आहे.
यामध्ये नजीकच्या गावातील 19 वर्षे युवकाचं युवकाचा मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातामध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची गाडी सुद्धा सापडली. या गाडीमध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयवंत करपे हेही प्रवास करत होते. सुदैवाने त्यांना कोणतीही फारशी दुखापत झालेली नाही.
यासंदर्भात महामार्ग पोलीस आणि रत्नागिरी ग्रामीण पोलीस घटना सही दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र झालेल्या या भीषण अपघातामुळे हातखंबा परिसरात भीतीच वातावरण पसरलं असून महामार्गावरील अनियंत्रित वाहतुकीला कधी निर्बंध बसेल अशी असा सवाल आता वाहन चालक उपस्थित करत आहेत.