पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्याचा शुभारंभ : प्रभाकर सावंत
वेंगुर्ले : प्रतिनिधी
देशातील १२० कोटीपेक्षा अधिक जनतेचा कुटुंबप्रमुख म्हणून मोदींनी प्रत्येकाचे आयुष्यमान उंचावेल, अशा योजना अमलात आणल्या आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात सेवा पंधरवडा साजरा करण्याची कल्पना भाजपने प्रत्यक्षात साकार केली आहे, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी वेंगुर्ले येथे बोलताना केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपने वेंगुर्ल्यात आयोजित केलेल्या महारक्तदान शिविरात १२६ दात्यांनी रक्तदान करून मोदीप्रती कृतज्ञता व्यक्त केली. भाजपतर्फे पंतप्रधानांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेवा पंधरवडा साजरा केला जात आहे. याचाही शुभारंभ यावेळी करण्यात आला.
यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी व बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय गोस्वामी तसेच जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई , जेष्ठ नेते राजु राऊळ , वेंगुर्ले तालुका भाजप मंडळ अध्यक्ष विष्णू उर्फ पपू परब, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. सुष्मा प्रमू-खानोलकर, वेंगुर्लाचे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, जि.का.का.सदस्य सुहास गवंडळकर, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ, मच्छीमार नेते दादा केळुसकर, पदाधिकारी साईप्रसाद नाईक, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रणव वायंगणकर आदी उपस्थित होते.
रक्तदान करून पंतप्रधानांच्या कार्याप्रती वाहिली कृतज्ञता : मनिष दळवी
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आपल्या रक्तदानामुळे कोणला तरी जीवदान मिळणार आहे. अलिकडच्या काळात अपघात व विविध शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढत आहे. अशावेळी रक्ताची मोठ्या प्रमाणावर गरज भासते. ही गरज मागविण्याच्या दृष्टीनेच वेंगुल्यात सेवा पंधरवड्याच्या शुभारंभाला महारक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १०० हून अधिक जणांनी रक्तदान करून पंतप्रधानांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे, असे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी म्हणाले.
रक्तदान चळवळीतील अग्रणी संस्था सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग-तुळस, भाजप युवा मोर्चा वेंगुर्ले, मेरा युवा भारत सिंधुदुर्ग, खर्डेकर महाविद्यालयाचे एनएसएस व एनसीसी विभाग, आयटीआय वेंगुर्ले, लोकनेते दत्ता पाटील होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय, हॉस्पिटल नाका मित्रमंडळ, छत्रपती मित्रमंडळ कॅम्प वेंगुर्ले आदी संस्थांच्या सहकार्यामुळे हे शिबीर यशस्वी झाले, असे यावेळी बोलताना सेवा पंधरवड्धाचे संयोजक तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. धनंजय गोस्वामी यांनी भाजपच्या कार्याचे कौतुक केले. हे शिबीर यशस्वी होण्यासाठी वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे सचिव प्रा. डॉ. सचिन परुळकर, विधी नाईक, जान्हवी सावंत, चैताली निकम, प्रा. राम चव्हाण, हेमंत गावडे, प्रा. सदाशिव सनगर, बापू वेंगुर्लेकर, धीरज आळवे, प्रथमेश देसाई, सानिया वराडकर, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे जिल्हा उपाध्यक्ष महेश राऊळ, तालुकाध्यक्ष आबा चिपकर, गोवा समन्वयक संजय पिळणकर, अलिस्टर ब्रिटो, अश्वेता माळकर आदींनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सचिन परुळकर यांनी केले.












