मसुरे | झुंजार पेडणेकरl मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवण्याबाबत वायंगवडे ग्रामपंचायत येथे खास ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती.सदरचे अभियान यशस्वीपणे श्रमदान लोकसहभाग व लोकवर्गणीच्या माध्यमातून राबविण्याबाबत सर्वानुमते ठरविण्यात आले. गावातील सार्वजनिक ठिकाणचे परिसर, रस्ते पानवटे, शाळा, अंगणवाडी, मंदिरे सार्वजनिक रित्या एकत्र येऊन स्वच्छता करण्याबाबत ठरविण्यात आले. सर्व शासकीय योजनांची अंमलबजावणी 100% करून गाव तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर विभाग स्तरावर व राज्यस्तरावर नेण्याच्या दृष्टिकोनातून एकत्रित येऊन सर्वानी प्रयत्न करण्याबाबत ठरवविण्यात आले. सदर सभेस सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,संपर्क अधिकारी म्हणून मालवण पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, सी एच ओ, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका,आशा स्वयंसेविका, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, प्रगती ग्राम सेवा संघाचे अध्यक्ष,सचिव व सर्व सदस्य सीआर पी, बचत गटाचे अध्यक्ष, सचिव व सर्व सदस्य तसेच मोठ्या संख्येने ग्रामसभा सदस्य उपस्थित होते.











