हडी गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा प्रारंभ!

मसुरे | झुंजार पेडणेकर : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान खास ग्रामसभा हडी येथे आयोजित करण्यात आली होती. सदर अभियान गावात प्रभावीपणे राबविण्याचा निश्चय यावेळी ग्रामस्थांनी केला.यावेळी हडी शाळा नंबर एक मधील विद्यार्थ्यांनी पंचायतराज समृद्धी अभियान अंतर्गत स्वच्छता विषयी पथनाट्य सादर केले. शासकीय योजनांची तसेच अभियान राबविण्या बाबत माहिती ग्रामपंचायत अधिकारी श्री एस एस.चौरे यांनी दिली. सरपंच प्रकाश तोंडवळकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित सरपंच श्री प्रकाश तोंडवळकर, उपसरपंच श्री भरत लाड, ग्रामपंचायत सदस्य श्री आनंद रावले ,श्री भावेश सुर्वे, सौ प्राची मयेकर, दीक्षा गावकर, सौ प्रज्ञा सुर्वे, सौ सुहासिनी वाळवे, ग्रामपंचायत अधिकारी श्री एस एस चौरे, संपर्क अधिकारी श्री दीक्षित सर, ग्राम महसूल अधिकारी श्री निलेश वरुडे ,कृषी सेवक श्री व्ही के रंगे, मुख्याध्यापक श्री एम व्ही कांबळी, एस ए कदम , श्री पी.आजगावकर , श्री के मोमिन सर, आरोग्य सेविका सौ संगीता मयेकर, माजी सरपंच श्री विलास हडकर, माजी उपसरपंच संतोष अमरे व सर्व माजी ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील श्री दिनेश सुर्वे, श्रीधर गोलतकर ,तृप्ती हडकर, जान्हवी पांजरी, अंगणवाडी सेविका सौ संपदा परब, चैताली मिठबावकर , जान्हवी शेडगे, आशा सेविका मानसी परब ,प्राची कदम , सविता कदम सीआरपी सौ वेदांती साळकर, तैसिन शेख, तंटामुक्त अध्यक्ष श्री महेश सुर्वे, ग्रामशिक्षण समिती अध्यक्ष श्री उमेश हडकर, कृषी मित्र श्री .शेडगे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री देवदास सुर्वे व सल्लागार चंद्रकांत पाटकर व बचत गटातील अध्यक्ष सचिव व सदस्य वनराई संस्थेचे अध्यक्ष व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, गावातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.