आचरा व्यापारी संघटनेतर्फे पोलीस प्रशासन आणि विद्यूत मंडळाचा सन्मान

आचरा -अर्जुन बापर्डेकर
गणेशोत्सव कालावधीत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखत संपूर्ण गणेशोत्सवात सुनियोजन करत वाहतूक कोंडी समस्या उद्भवू न देता. दिवस रात्र कष्ट घेणा-या पोलीस प्रशासनाचे तसेच गणेशोत्सव कालावधीत विद्यूत पुरवठ्यात कोणतेही विघ्न न देता विद्यूत पुरवठा निर्विघ्नपणे सुरळीत राहण्यासाठी परीश्रम घेतलेल्या विद्यूत मंडळाचे आचरा व्यापारी संघटनेतर्फे सन्मान करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार, विद्यूत मंडळाचे आचरा येथील सहा अभियंता सौरभ कुमार वर्मा यांना व्यापारी संघटनेतर्फे आभार पत्र देत सन्मान करण्यात आला. यावेळी आचरा सरपंच जेरोन फर्नांडीस, व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, उपाध्यक्ष मंदार सांबारी, परेश सावंत, सचिव व ग्रामपंचायत सदस्य पंकज आचरेकर, खजिनदार जयप्रकाश परुळेकर, राजन पांगे,देवेंद्र नलावडे, संदिप पांगम विद्यूत मंडळाचे स.अभियंता ओम शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.