कोळकेवाडीतील प्रयोगभूमीत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
विद्यार्थ्यांशी साधला संवाद
चिपळूण (प्रतिनिधी) : शिक्षणासोबतच समाजसेवेची परंपरा जपणाऱ्या पेढांबे येथील मंदार एज्युकेशन सोसायटीने पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले आहे. संस्थेच्या वतीने कोळकेवाडी येथील श्रमिक सहयोग संचलित प्रयोगभूमी या संस्थेला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे प्रयोगभूमीतील विद्यार्थी व रहिवासी वर्ग आनंदित झाला असून संस्थेच्या कार्याला सर्व स्तरातून दाद मिळत आहे.
याप्रसंगी सौ. शैलजा शिंदे आर्टस्, सायन्स, कॉमर्स वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दयानंद रांजणे, लेफ्ट. शशिकांत गावडे अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य भारत सुळे, राजाराम शिंदे कॉलेज ऑफ एमबीएचे संचालक दत्तप्रसाद मिरजकर, मुख्य सुरक्षा अधिकारी जितेंद्र कांबळे, प्रा. दादा गडदे, प्रा. संदीप थिटे, प्रा. शोभा पाटील, प्रा. बाळू कांबळे, प्रा. उज्ज्वला रांजणे, प्रा. सुजित मोहिते, ग्रंथपाल प्रताप पाटील व ग्रंथपाल सुर्वे, प्रयोगभूमीचे मंगेश मोहिते आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी प्रयोगभूमीतील विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या गरजांची माहिती घेतली. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान हे या उपक्रमाचे यश असल्याचे मत सर्वांनी व्यक्त केले.
या उपक्रमाचे विशेष कौतुक संस्थेचे चेअरमन मंदार राजाराम शिंदे व व्हाईस चेअरमन शैलजा राजाराम शिंदे यांनी केले. ‘शिक्षणासोबत समाजसेवा हीच खरी शैक्षणिक परंपरा आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनमान उंचावण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम वेळोवेळी राबवले जातील,’ असेही त्यांनी यावेळी नमूद केले. मंदार एज्युकेशन सोसायटी नेहमीच सामाजिक जाणीव जोपासत विविध उपक्रम राबवत असल्याने स्थानिकांमध्ये संस्थेच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.













