कोकण रेल्वे UPDATE : गणेशोत्सवानिमित्त अतिरिक्त चिपळूण – पनवेल विशेष गाड्या

रत्नागिरी (प्रतिनिधी) :
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेकडून चिपळूण – पनवेल – चिपळूण दरम्यान अतिरिक्त अनारक्षित विशेष मेमू गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गाडी क्र. 01160 चिपळूण – पनवेल मेमू अनारक्षित विशेष
ही गाडी चिपळूण येथून सकाळी ११.०५ वाजता सुटेल व दुपारी ४.१० वाजता पनवेलला पोहोचेल. ही विशेष गाडी ५, ६ व ७ सप्टेंबर २०२५ रोजी चालविण्यात येणार आहे.

गाडी क्र. 01159 पनवेल – चिपळूण मेमू अनारक्षित विशेष
ही गाडी पनवेल येथून सायं. ४.४० वाजता सुटेल व रात्री ९.५५ वाजता चिपळूण येथे पोहोचेल. ही गाडी देखील ५, ६ व ७ सप्टेंबर २०२५ रोजी धावेल.

दोन्ही गाड्यांना अंजनी, खेड, कलंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विंहरे, करंजाडी, सापे, वामने, वीरे, गोरेगाव रोड, मंगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, नागोठणे, कासू, पेण, जिते, आपटा व सोमटणे या स्थानकांवर थांबे असतील.

या गाड्या एकूण ८ मेमू डब्यांच्या रचनेत धावतील.

प्रवाशांनी या विशेष गाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आले आहे.