खेड – (प्रतिनिधी)
बुधवार दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी एल. टी. टी. इंग्लिश मिडिअम स्कूलच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त तालुकास्तरीय बुध्दीबळ स्पर्धा एल. टी. टी. इंग्लिश मिडिअम स्कूल येथे संपन्न झाली. यामध्ये रोटरी स्कूलच्या कु. शौर्य समीर गवस (इ. 8वी) याने प्रथम क्रमांक व कु. सर्वेश श्रीकांत दामले (इ. 9वी) याने पाचवा क्रमांक पटकावून यश प्राप्त केले.
सदर बुध्दीबळ स्पर्धेकरिता तालुक्यातून अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये प्रतिस्पर्धकांजवळ चुरशीची लढत देत *14 वर्षे या वयोगटात* कु. शौर्य गवस (इ. 8वी) याने प्रथम क्रमांक तर *15 वर्षे या वयोगटात* कु. सर्वेश दामले याने पाचवा क्रमांक प्राप्त करून आपले व आपल्या शाळेचे नाव गौरवित केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांना रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे.
वरील यशस्वी बुध्दीबळपटूंना शाळेतील क्रीडाशिक्षिका सौ. शितल घाणेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे चेअरमन मा. बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी बुध्दीबळपटूंचे अभिनंदन केले.













