गोळवण येथे 20 सप्टेंबर रोजी आरोग्य शिबीर!

मसुरे | झुंजार पेडणेकर : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्त गोळवण ग्रामपंचायत येथे 20 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 2 या वेळेत मोफत आरोग्य शिबीर

टेलीमेडिसिन सेंटर आयुष्मान आरोग्य केंद्र गोळवण व ग्रामपंचायत गोळवण-कुमामे डिकवल कार्यालय

यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे.

यावेळी तज्ञ डॉक्टर्स सोबत ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन,

रक्तदाब तपासणी (blood pressure ),

मधूमेह तपासणी ( diabetic),

मोफत रक्त तपासणी. CBC ,LFT,KFT,SR CALCIUM Electrolyte करण्यात येणार आहे.उपलब्ध औषधे सुद्धा मोफत दिली जाणार आहेत. याची सर्वांनी नोंद घ्यावी. लाभ घेण्याचे आवाहन सरपंच सुभाष लाड यांनी केले आहे.