खेड –
ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड-रत्नागिरी यांच्या विद्यमाने संचालित ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल, मोरवंडे बोरज (सीबीएसई) येथे चिपळूण येथील प्रथितयश व्यक्तिमत्व लायन MJF डॉ. शेखर रघुवीर कोवळे यांचे “ऍक्टिव्ह लिसनिंग” या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे सरचिटणीस माधव पेठे यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ. कोवळे यांचे स्वागत केले. त्यानंतर शाळेचे प्राचार्य श्री. भरत मोरे यांनी उपस्थितांना डॉ. शेखर कोवळे यांच्या कार्याची आणि व्यक्तिमत्त्वाची थोडक्यात ओळख करून दिली.
या व्याख्यानात डॉ. कोवळे यांनी विद्यार्थ्यांना “ऍक्टिव्ह लिसनिंग” म्हणजे काय, त्याचे जीवनात व शिक्षणात असलेले महत्त्व तसेच यशस्वी व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी आवश्यक असलेली एक मूलभूत कौशल्य याबाबत ओघवत्या शैलीत मार्गदर्शन केले. त्यांनी विविध उदाहरणांचा आधार घेत विद्यार्थ्यांना सक्रिय ऐकण्याची सवय कशी अंगीकारावी यावर विशेष भर दिला.
या व्याख्यानास शाळेतील इयत्ता आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. लायन्स क्लब खेड सिटीचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, लायन्स क्लब खेडचे माजी अध्यक्ष सुरेश चिकणे, तसेच रोहण विचारे यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य श्री. भरत मोरे, ज्ञानदीप विधी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. उमेशकुमार बागल, ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळाचे रजिस्ट्रार सितारामपंत जामकर, ज्ञानदीप कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. सुजित नगरे, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या अशा उपक्रमांमुळे ज्ञानदीप संस्थेचे सामाजिक व शैक्षणिक योगदान अधोरेखित झाले.









