भाजपा मंडणगड यांच्यावतीने नगरपंचायत कर्मचाऱ्यांचा गौरव

मंडणगड : प्रतिनिधी, – पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या75 व्या वाढदिवसानिमित्त17 सप्टेंबर रोजी भाजपा मंडणगड यांच्या वतीने मंडणगड नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचा गौरव समारंभ नगरपंचायत सभागृहात साजरा करण्यात आला.
सेवा सुशासन पंधरवडा निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंडणगड नगरपंचायत येथील स्वछता,सेवा कर्मचारी यांचा उत्कृष्ट सेवा सन्मान सामाजिक सद्भावना म्हणून सत्कार करण्यात आला. यावेळी नगरपंचायत मंडणगड चे सर्व कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते. त्यांचा सन्मान भाजपा तालुकाध्यक्ष प्रवीण कदम ,जिल्हा उद्योग आघाडीचे अध्यक्ष गिरश जोशी, तालुका उपाध्यक्ष पुष्पराज कोकाटे,भाजपा जिल्हा सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष वैभव नारकर, युवा आघाडीचे मकरंद रेगे, तालुका सरचिटणीस यश मेहता व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
देशभरात सेवा सुशासन पंधरवडा साजरा होत आहे.या निमित्त भारतीय जनता पार्टी, मंडणगडच्या वतीने तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने तालुकास्तरीय व बूथ स्तरीय विविध सेवा कार्यक्रम आयोजित केले आहेत. यामध्ये आरोग्य शिबिरे, स्वछता मोहीम, रक्तदान शिबिरे घेण्यात येणार असून शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहचत आहेत का याचा आढावा घेण्यात येणार आहे. याचबरोबर 21 सप्टेंबर रोजी युवा मॅरेथॉन, 25 सप्टेंबर रोजी लोकनेते स्व. दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी होणार आहे. लोकनेते दीनदयाळ उपाध्याय यांनी सुरू केलेले अंत्योदय संकल्पनेतून सुरू केलेले कार्य भाजपाच्या वतीने पुढे नेले जात आहे, या पुढेही ते राहील यासाठी विचारमंथन कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. पंधरवड्यात आत्मनिर्भर भारत, 28सप्टेंबर रोजी मन की बात, 2ऑक्टोबर रोजी माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री व महात्मा गांधी जयंती पर्यंत हा पंधरवडा साजरा होणार असल्याची माहिती भाजप मंडणगड तालुका अध्यक्ष प्रवीण कदम यांनी माध्यमांशी बोलताना दिली.