भाजपा महिला मोर्चा पुर्व मंडळ तालुका अध्यक्षपदी स्वाती करंगुटकर यांची निवड

राजापूर (वार्ताहर): भारतीय जनता पार्टी राजापूर तालुका पुर्व मंडळ महिला मोर्चा तालुका अध्यक्ष पदी सौ. स्वाती करंगुटकर यांची निवड झाली आहे. या निवडीबाबत घोषणा नुकतीच करणेत आली आहे. त्यांच्या निवडीने पुर्व विभागात भाजपा महिला मोर्चा संघटन अधिक बळकट होणार आहे.
त्यांच्या या निवडीबद्ल भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, सरचिटणीस अमित केतकर, महिला मोर्चा प्रदेश सचिव सौ.शिल्पा मराठे, ओबीसी प्रदेश सचिव अनिलकुमार करंगुटकर, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर,अभिजित गुरव, पुर्व मंडळ तालुका अध्यक्ष एड. एकनाथ मोंडे, पश्चिम मंडळ तालुका अध्यक्ष मोहन घुमे, महिला जिल्हाध्यक्षांसह सर्व महिला आघाडी पदाधिकारी यांसह सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.