फोंडाघाट अखंड हरिनाम सप्ताह च्या विविध स्पर्धाना उदंड प्रतिसाद ! संततधार पर्जन्यवृष्टीत सुद्धा नियोजनाचे सर्वांकडून कौतुक !

संगीत भजन स्पर्धेत श्रीदत्तकृपा प्रासा. भजन मंडळ, वैभववाडी तर रिल्स स्पर्धेत अथर्व रेवडेकर आणि रेकॉर्ड डान्स स्पर्धेत तीर्था रेवडेकर प्रथम !

फोंडाघाट | कुमार नाडकर्णी — फोंडाघाट मधील श्रीदेव राधाकृष्ण मंदिरामध्ये,नुकत्याच पार पाडलेल्या, अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने विविध स्पर्धा घेण्यात आल्या . पहिल्या तीन दिवसात फोंडाघाट मध्ये आर. के.ग्रुप तर्फे संगीत भजन स्पर्धा प्रचंड रसिकांच्या उपस्थितीत पार पडल्या. यामध्ये प्रथम क्रमांक श्रीदत्तकृपा प्रासादिक भजन मंडळ, वैभववाडी (बुवा- विराज तांबे), द्वितीय- श्रीगुरुकृपा संगीत भजन मंडळ, वर्दे- कुडाळ (बुवा- अद्वैत पालव,तृतीय- श्रीचिंतामणी प्रासा. भजन मंडळ, सुरंगपाणी- वायंगणी( बुवा – अनिकेत भगत) चतुर्थ – रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ, घोडगे (बुवा- हर्षद ढवळ) पाचवा-श्रीदत्तगुरु प्रसादिक भजन मंडळ, वैभववाडी,( बुवा – विलास नर) शिस्तबद्ध संघ -गोठण भजन मंडळ,वजराट .गायक – नागेश पाटील-राधानगरी.हार्मोनियम- स्वरधारा प्रासादिक भजन मंडळ. पखवाज – सागर चव्हाण, तबला- दिलीप मेस्त्री, कोरस- कलेश्वर पूर्वादेवी भजन मंडळ, झांज- रोहन रेडकर. उत्कृष्ट गजर- प्रथमेश मोरजकर,ब्राह्मण देव भजन मंडळ – सावंतवाडी. यांना स्मरणचिन्ह व रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.. यादरम्यान विविध सेवा देणाऱ्या, सहकार्य करणारे गावातील विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. भजन स्पर्धेचे परीक्षक म्हणून ज्ञानेश्वर येंडे – फोंडा व तुषार परब चिंदर यांनी काम पाहिले …

 

 

 

प्रचंड उत्साहात पार पडलेल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे नियोजन, सूत्रसंचालन आणि नृत्यदिग्दर्शन रसिका कुबडे यांनी केले. रेकॉर्ड डान्स स्पर्धेत तीर्थ रुपेश रेवडेकर – प्रथम, श्रेया साहिल डोरले- द्वितीय,अस्मि गणपत वळंजू – तृतीय, मृणाल किशोर सामंत- उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. या स्पर्धेचे परीक्षण भरत मोरे व सायली पवार यांनी केले. यावेळी राधाकृष्ण महिला कलामंच ने सादर केलेले “— आमचे ह्यो कोकण ” या लोकप्रिय गाण्यांमध्ये कौटुंबिक गृहिणींनी सहभाग घेतला. त्यांचे रसिकांनी कौतुक केले . .

 

 

 

यादरम्यान रिल स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये अथर्व रेवडेकर- प्रथम, साक्षी मसुरकर- द्वितीय, दिशात जाधव- तृतीय आणि छोट्या अर्णव साळवी यांनी लक्षवेधी उत्तेजनार्थ बक्षिसे मिळवली. त्यांना बाल गोपाळ मंडळातर्फे गौरविण्यात आले ..

 

 

या स्पर्धात्मक कार्यक्रमांमध्ये स्थानिकांना व्यासपीठ मिळून आपल्या कलाकारीचे दर्शन घडले.त्यामुळे स्पर्धकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.बाल गोपाळ मंडळाचे आणि आर. के. ग्रुपचे तसेच नृत्यदिग्दर्शिका रसिका कुबडे यांचे रसिकांनी कौतुक केले..