जिल्हा बँकेच्या वतीने शेतकऱ्यांना आंबा, काजू कलमांचे वाटप

बँकेच्या वर्धापन दिनी वैभववाडी शाखेचा स्त्यूत्य उपक्रम

वैभववाडी | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या 40 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून वैभववाडी शाखेच्या वतीने शेतकऱ्यांना वृक्ष वाटप करण्यात आले. बँकेचे संचालक दिलीप रावराणे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना आंबा, काजू कलम व नारळ रोपांचे यावेळी वाटप करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा वैभववाडीचे शाखा व्यवस्थापक प्रभाकर गायकवाड, विकास अधिकारी प्रल्हाद कुडतरकर, सहाय्यक शाखा व्यवस्थापक सुरेश रावराणे, कर्मचारी जयेश सावंत, विश्वनाथ चांदोडे, रूपाली शेळके, अस्मिता रावराणे, सुरेश शेळके, अजित हुंबे, सचिन रावराणे, संतोष गुरव आदी उपस्थित होते. त्याचबरोबर शेतकरी संभाजी रावराणे, विजय सावंत, रवींद्र रावराणे, प्रवीण रावराणे, भालचंद्र रावराणे, संतोष सावंत, नारायण रावराणे, सिद्धेश रावराणे आदी उपस्थित होते. यावेळी सर्व शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेचे आभार मानले.