सागरेश्वर समुद्रकिनाऱ्यावर राबविला “स्वच्छता उत्सव” : जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांची होती उपस्थिती

वेंगुर्ले l दाजी नाईक :सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती वेंगुर्ले यांच्या माध्यमातून उभादांडा ग्रामपंचायत तर्फे सागरेश्वर समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता उत्सव कार्यक्रमांतर्गत आज शनिवारी स्वच्छता मोहीम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या उपस्थितीत राबविण्यात आली. स्वच्छता ही फक्त मोहिमेपूर्ती मर्यादित न ठेवता ती आपली जबाबदारी आहे असे समजून आपल्यामुळे आजूबाजूचा परिसर अस्वच्छ होणार नाही यासाठी प्रत्येकाने दक्षता घेतली पाहिजे असे आवाहन यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी केले.

स्वच्छता मोहिमेमुळे सागरेश्वर समुद्र स्वच्छ झाला. या मोहिमेमध्ये उभादांडा सरपंच श्री.निलेश चमणकर, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा श्री.संदेश राणे, उप मु.का.अधिकारी पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग श्री.अजिंक्य सावंत, वेंगुर्ले चे तहसीलदार श्री.ओंकार ओतारी, वेंगुर्ले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री.व्ही. एम.नाईक, उभादांडा उपसरपंच सौ.कालेसतीना आलमेडा तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी श्री.व्ही.जी.सावंत, वेंगुर्ले खर्डेकर महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी, न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा हायस्कूल चे शिक्षक व विद्यार्थी, उभादांडा प्राथमिक शाळा नं.१ चे शिक्षक, विद्यार्थी तसेच बचत गट महिला,

ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते. स्वच्छता करताना किनाऱ्यावर आढळलेले प्लास्टिकचे कागद, प्लास्टिक बॉटल, थर्माकोल, समुद्रातून वाहून आलेले साहित्य असा सर्व कचरा एकत्र गोळा करून समुद्रकिनारा स्वच्छ करण्यात आला. दरम्यान आज सकाळी मॉर्निंग वॉक साठी जाणाऱ्या मॉर्निंग ग्रुपच्या वतीने मोहन होडावडेकर, राजन गावडे, ग्रामपंचायत सदस्य परुळेकर, संजय भाटकर व सदस्यां कडून समुद्र किनारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.