भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त अणाव आनंदाश्रम तसेच कातकरी समाजाच्या वस्तीगृहाला आर्थिक मदत 

भाजपा ओरस मंडल यांच्या वतीने उपक्रम 

कुडाळ :भारतीय जनता पार्टी चे महाराष्ट्र प्रदेश चे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी ओरोस मंडल यांच्यावतीने कुडाळ तालुक्यातील अणाव येथील आनंदाश्रम तसेच वेताळ बांबर्ड येथील कातकरी समाजातील अनाथ मुलांच्या वसतिगृह ला आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी ओरस मंडल अध्यक्ष आनंद भाई सावंत, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जयेश चिंचळकर,उदय जांभवडेकर, छोटू पारकर, सुप्रिया वालावलकर, दिनेश जैतापकर, योगेश तावडे, अमित भोगले, बाबाजी मस्के, सुनील जाधव,गौरव घाडीगांवकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.