विजयदुर्ग ग्रामपंचायतीच्या वतीने समुद्रकिनारी साफसफाई उपक्रम

विजयदुर्ग ( प्रतिनिधी ) :आंतराष्ट्रीय स्वच्छता दिनाचे औचित्य साधून शनिवार दि. २० सप्टेंबर रोजी विजयदुर्ग समुद्रकिनारा स्वच्छता अभियान विजयदुर्ग ग्रामपंचायतीच्यावतीने राबविण्यात आले. यावेळी या स्वच्छता अभियानाला कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, दिशांत कोळप, कृषी विस्तार अधिकारी पंचायत समिती देवगड, अभिजीत मदने, विजयदुर्ग प्रभारी सरपंच रियाज काझी, ग्रामसेवक वारे, ग्रा. पं. सदस्या शुभा कदम, प्रतिक्षा मिठबावकर, पूर्वा लोबर, वैशाली किर, वैशाली पडेलकर, दशरथ तळेकर, महेश बिडये, राजेंद्र परूळेकर, विद्याधर माळगावकर, विजयदुर्ग एस. टी. आगार प्रमुख जमाले आदी उपस्थित होते. विजयदुर्ग समुद्रकिनारा सकाळी साडेआठ वाजता या स्वच्छता मोहीमेची सुरूवात करण्यात आली. या स्वच्छता मोहीमेत आय. ई. एस विद्यालय, विजयदुर्ग शाळेचे विद्यार्थी,उर्दु हायस्कूल विद्यार्थी, विजयदुर्ग पंचक्रोशीतील ग्रामस्थ, विजयदुर्ग एस. टी कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, महिला बचत गट, गाव पातळीवरील सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी २० बॅगा कचरा गोळा करण्यात आला.या कचऱ्याचे वर्गीकरण करून तो वेगळा करण्यात आला.