झुंजार तरुण मंडळ पुनस वरचीवाडी तर्फे नवरात्रौत्सवाचे आयोजन

लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील पुनस येथील झुंजार तरुण मंडळ पुनस वरचीवाडी यांच्या वतीने सोमवार दि. २२ सप्टेंबर पासून नवरात्रौत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंडळाच्या वतीने सलग २५ व्या वर्षी हा नवरात्रोत्सव साजरा केला जातो आहे. २२ सप्टेंबर –
रोजी देवीचे आगमन होणार आहे. रात्री १० वाजता पाली येथील भजनाचा कार्यक्रम होणार आहे. २४सप्टेंबर- रोजी रात्री चाफेट नेमणवाडी येथील टिपरी नृत्याचा कार्यक्रम होणार आहे.दि. २४ रोजी हरिपाठ (वारकरी संप्रदाय), दि. २५ रोजी वाडीतील टिपरिनृत्य, दि. २६ सप्टेंबर रोजी चाफेट मधील जाकडी नृत्य, २७ सप्टेंबर रोजी संगीत भजन, दि. २८ रोजी नाखरेतील कार्यक्रम, २९ रोजी होम मिनिस्टर स्पर्धा, दि.‌३९ सप्टेंबर रोजी सत्यनारायण महापूजा, महाप्रसाद व रात्री शाहीर विकास लांबोरे व संदीप मोरे
यांचा जाकडी नृत्याचा सामना होणार आहे.
दिनांक १ ऑक्टोबर रोजी सांस्कृतिक कार्यक्रम, २ ऑक्टोबर रोजी फॅन्सी ड्रेस स्पर्धा व ३ ऑक्टोबर देवीची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.