सामाजिक बांधिलकी सेवाप्रती गुढेगाव गावचे शांताराम तांबे यांचा शतकपूर्ण सोहळा थाटात संपन्न

चिपळूण (वार्ताहर) : गुढे गावचे सामाजिक बांधिलकीची जोपासना करणारे सेवाव्रत्ती शांताराम तांबे यांचा जन्म १७/९/२/१९२५ रोजी गुढे येथे झाला. १७/९/२०२५ ला त्यांना शंभर वर्षे पूर्ण झाली. शतक पूर्ण सोहळा थाटात संपन्न झाला.
त्यांचे शिक्षण गुढे, गुहागर, वहाळ, मुंबई येथे झाले. मुंबई येथे दूध, पेपर टाकण्याचे काम केले. हॉटेलमध्ये वेटर म्हणून सेवा केली. १९४२ साली गवालिया ट्रॅक येथे काँग्रेसचे अधिवेशन झाले. त्यात त्यांनी सहभाग घेतला. नंतर ते मुंबईहून गुढे येथे आले. १९४७ मध्ये ते विवाहबद्ध झाले. १९४४ साली चिपळूण तहसीलदारांनी १६ गावांची रेशन दुकानची जबाबदारी सोपविली. परिसरातील लोकांची रेशन धान्य दुकानातून सेवा केली. किराणा मालाचे दुकानदार म्हणून काम करीत आहेत. रामपूर एज्युकेशन सोसायटीचे काही दिवस चेअरमन म्हणून काम केले. गुढे, कोंडवी, मोरेवाडी रस्ते एस.टी बस सेवा सुरू केली. गरिबांना मदत करणारे आहेत. गुढे येथे शतक पूर्ण अभिष्टचिंतन सोहळा निमित्त सुहासिनीने ओवाळले. मुंबई, पुणे, पनवेल, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी, वहाळ, रामपूर, मार्कंडी, मिरवणे, शिरवली, ताम्हणमळा, डूगवे येथील त्यांचे स्नेही, आप्तेष्ट यांनी अभिष्टचिंतन सोहळ्यात सहभागी होऊन त्यांचा सत्कार केला. सर्व तांबे कुटुंबीय, काटदरे, पाध्ये, प्रकाश देशपांडे, डॉक्टर, हितचिंतक उपस्थित राहून दीर्घायुष्य त्यांना लाभो अशा शुभेच्छा दिल्या. रामपूर मार्गताम्हाणे पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष अनिलकुमार जोशी यांनी शांताराम तांबे साहेब यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. अभिष्टचिंतन शतक पूर्ण सोहळा थाटात संपूर्ण झाला.