चिपळूण (वार्ताहर) : कुणबी शिक्षण मंडळ चिपळूण या संस्थेच्या वतीने चिपळूण तालुक्यातील कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थांचा गुणगौरव सोहळा रविवार दि. १५ जुन रोजी सकाळी १०.३० वाजता कुणबी शिक्षण मंडाळाच्या, खेर्डी येथील वसतिगृहातील सभागृहामध्ये संस्थेचे अध्यक्ष वसंत बाळाराम उदेग यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे.
कुणबी शिक्षण मंडळ चिपळूण दरवर्षी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारत असते. यातूनच विद्यार्थ्यांना नवी दिशा आणि प्रेरणा मिळते. सन २०२४/२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वी मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ८० टक्केपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत आणि इयत्ता १२ वी मध्ये ७० टक्केपेक्षा जास्त गुण मिळवलेले विद्यार्थी, शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी तसेच पदविधर, डॉक्टर, वकिल, इंजिनीअर उत्तीर्ण झाले आहेत, अशा विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
सदर विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रकाची झेरॉक्स घेऊन कुणबी शिक्षण मंडळाच्या खेर्डी येथील सभागृहात सत्कार समारंभाला उपस्थित रहावे, असे सूचित करण्यात आले आहे. याच दिवशी कुणबी शिक्षण मंडळाच्या वतीने देण्यात येणारा समाज भूषण पुरस्कार यावर्षी वसतिगृहाचे माजी विद्यार्थी हरिश्चंद्र गोताड यांना देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे सेक्रेटरी संजय तांदळे यांनी केले आहे.









