वेंगुर्ले : प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. कै. वसंतरावजी नाईक यांच्या जन्मदिनी 1 जुलै हा कृषी दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने परबवाडा ग्रामंचायत व परबवाडा शाळेच्या वतीने शाळेच्या व आरोग्य केंद्राच्या परीसरात वृक्ष लागवड केली. यावेळी सरपंच शमिका बांदेकर, उपसरपंच पपू परब, ग्रामपंचायत सदस्य हेमंत गावडे, संतोष सावंत, सूहिता हळदणकर, स्वरा देसाई, कार्तिकी पवार, अरुणा गवंडे, मुख्याध्यापक झोरे सर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप परब, जाधव सर, ग्रामसेवक प्रवीण नेमन,आरोग्य सेविका किरण मोरजकर, कोमल मांजरेकर, शैलेश बांदेकर, नरेंद्र नाईक, सिद्धेश कापडोसकर, राजा परब व विद्यार्थी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.










