फोंडाघाट वि. का .स. सेवा सोसायटी ची वार्षिक विशेष सर्वसाधारण सभा २७ सप्टेंबर रोजी !

फोंडाघाट | कुमार नाडकर्णी– फोंडाघाट विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड, फोंडाघाट या संस्थेची सन २०२४– २५ या सहकारी वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक २७- ९- २५ रोजी दुपारी तीन वाजता शांताराम मंगल कार्यालय, फोंडाघाट येथे आयोजित करण्यात आलेली आहे. सभेचे कामकाज सभेपुढील विषयांप्रमाणे होईल. गणपूर्ती अभावी सभा तहकूब झाल्यास अर्धा तास वाट पाहून, सदर सभेचे कामकाज कार्यक्रम पत्रिकेनुसार पार पाडण्यात येईल. त्याला गणपूर्तीची आवश्यकता राहणार नाही. तरी सर्व सदस्यांनी वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन सचिव प्रसाद देसाई आणि चेअरमन राजन नानचे याचे कडून करण्यात आले आहे…