सत्यम फाउंडेशन जत व SSD ट्रस्टचा उपक्रम
गुहागर (प्रतिनिधी ): तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तळवली नं. ३ आगरवाडी येथे गरजू विद्यार्थ्यांना शालेपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम मंगळवार, 23 सप्टेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता संपन्न झाला. या उपक्रमाचे आयोजन सत्यम फाउंडेशन जत यांच्या वतीने एस.एस.डी. ट्रस्टचे सामाजिक विकास केंद्र, शृंगारतळी (गुहागर) यांच्या सहकार्याने करण्यात आले होते.
कार्यक्रमाला सत्यम फाउंडेशनचे प्रा. गोविंद भास्करराव सानप, प्रा. अनिल शशिकांत हिरगोंड, प्रा. निळकंठ सखाराम भालेराव, प्रा. संतोष विठ्ठलराव जाधव, SSD सामाजिक विकास केंद्र गुहागरचे अध्यक्ष मार्शल प्रमोद पवार, सचिव उत्तम पवार, ग्रामपंचायत सदस्य सुनील मते, मानसी पोफळे, पूर्वा पवार, अंगणवाडी सेविका प्रेरणा पवार, सुनिता सांगळे, मदतनीस आश्विनी पवार, मितांजली पवार तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. जानवळकर सर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. अपूर्वा केतकर, उपाध्यक्ष पत्रकार आशिष कारेकर, ग्रामस्थ राकेश मोहिते आदी उपस्थित होते.
सर्वप्रथम मुख्याध्यापक जानवळकर सर यांनी पुष्पगुच्छ देऊन उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर पूर्वा विजय सांगळे (1 ली), पियूष प्रमोद मते (2 री),
अनन्या अमित डाकवे (2 री),
रुद्र गणेश डाकवे (4 थी ),
गुंजन प्रकाश डाकवे (4 थी),
परी राकेश मोहिते (3 री ),
प्रबुद्ध प्रवीण येलवे (5 वी) या गरजू विद्यार्थांना शालेपयोगी साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी सत्यम फाउंडेशनचे प्रा. सानप सर यांनी मार्गदर्शन केले व शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. तसेच फाउंडेशनचे कार्य स्पष्ट करतानाच कोणत्याही विद्यार्थ्याला शिक्षणाबाबत अडचण निर्माण झाल्यास आम्ही त्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहू, असे सांगितले.
ग्रामपंचायत सदस्य सुनील मते यांनी सत्यम फाउंडेशन जत व SSD सामाजिक विकास केंद्राने ग्रामीण भागातील आमच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केल्याबद्दल आभार मानले. तसेच सामाजिक विकास केंद्रामार्फत शृंगारतळी येथे मोफत अभ्यासिका केंद्र सुरू आहे, या केंद्राच्या मदतीसाठी आपणही सहभागी होणार असल्याचे जाहीर केले. मुख्याध्यापक जानवळकर सर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगती साधण्यास निश्चितच मदत होईल. भविष्यात हे विद्यार्थीही समाजासाठी कार्य करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केले. यावेळी अंगणवाडी सेविका सुनिता सांगळे, आशिष कारेकर, प्रमोद पवार, उत्तम पवार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.









