गुहागर प्रतिनिधी:
तालुक्यातील तळवली येथे प्रथमच ग्रामदेवता श्री सुकाई देवी चषक 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. 28 व रविवार दि. 29 रोजी ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.
तळवलीची ग्रामदेवता श्री सुकाई देवी ही नवसाला पावणारी म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे. देवस्थानच्या माध्यमातून प्रथमच या ठिकाणी भव्य मोठी क्रिकेट स्पर्धा आयोजित केली जात असून प्रशांत केळसकर यांनी आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा पुरस्कृत केली आहे. सदर स्पर्धा ही एक ग्रामपंचायत व खुला गट अशी खेळवण्यात येणार आहे. सदर स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 20 हजार व चषक,द्वितीय पारितोषिक 15 हजार व चषक तृतीय पारितोषिक 5 हजार व चषक,चतुर्थ पारितोषिक 4 हजार व चषक असणार आहे. तसेच उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज मालिकावीर व प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर यांना देखील चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. सदरची स्पर्धा श्री. सिद्धिविनायक मंदिर डावलवाडी रोड तळवली या ठिकाणी पार पडणार आहे. स्पर्धेत प्रवेश घेण्यासाठी 3 हजार रुपये प्रवेश शुल्क असणार असून चेंडू मोफत आयोजकांच्या वतीने दिला जाणार आहे. तरी सदर स्पर्धेत जास्तीत जास्त संघानी सहभाग नोंदवावा व संघ नोंदणीसाठी प्रदीप चव्हाण 7744080376, गणपत शिगवण, दिलीप आग्रे यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन देवस्थान कमिटी व देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.












